Nitesh Rane : शिवसेनेचे संतोष परब यांच्यावर झालेल्या हल्ला प्रकरणी भाजपा आमदार नितेश राणे यांना आता दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. ४ फेब्रुवारीपर्यंत त्यांना ही पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. या अगोदर त्यांनी हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला. तसेच, ते न्यायालयासमोर शरण देखील आले होते. त्यांनी स्वत: याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली होती.
नितेश राणे यांचे वकील सतीश माने शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितेश राणे यांना सुप्रीम कोर्टाने दिलेल्या संरक्षणामध्ये पाच दिवस अद्याप बाकी असतानाही तपास अधिकाऱ्यासमोर शरण जात असल्याचे सांगत हायकोर्टात केलेला जामीन अर्ज मागे घेतला आहे. नितेश राणेंना तपासाला सामोरं जाण्याची इच्छा असल्याचेही ते म्हणाले. त्याचबरोबर हायकोर्टानेदेखील अर्ज मागे घेण्यास परवानगी दिली आहे, असं राणे यांच्या वकिलाकडून सांगण्यात आले आहे.
Web Title : MLA Nitesh Rane remanded in police custody for two days