आमदाराच्या पुत्राचे अपहरण, तिघांना अटक
Breaking News | Shirur Crime: अपहरण, अश्लील व्हिडीओ व खंडणीप्रकरणी शिरूर पोलिसांनी रविवारी मांडवगण येथून तीन जणांना अटक.
शिरूर: शिरूरचे शरद पवार गटाचे उमेदवार आमदार अशोक पवार यांचा मुलगा ऋषिराज पवार यांचे अपहरण, अश्लील व्हिडीओ व खंडणीप्रकरणी शिरूर पोलिसांनी रविवारी मांडवगण येथून तीन जणांना अटक केली. मां
डवगण ग्रामपंचायतीचे सदस्य भाऊसाहेब बिरा कोळपे (२४), मयूर संजय काळे (२२), तुषार बळीराम कुंभार (२४, रा. सर्व मांडवगण) अशी अटक संशयितांची नावे आहेत. त्यांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. शनिवारी अपहरणाचा हा प्रकार घडला. ऋषिराज पवार वडिलांचा प्रचार करत होते. दरम्यान त्यांच्याच कार्यकर्ता भाऊ कोळपेने त्यांना एक बैठक घ्यायची असल्याचे सांगितले. त्यामुळे ऋषिराज हे मांडवगण फराटा येथील एका गावात गेले. तेथे त्यांना एका खोलीत नेऊन कोळपे आणि दोघांनी हात-पाय बांधून कोंडले. नंतर ऋषीराज यांना विवस्त्र केले, एका महिलेला बोलवून तिला ऋषीराज यांच्यासोबत अश्लील चाळे करण्यास सांगितले. तिथे फोटो आणि व्हिडीओ काढले, त्यानंतर १० कोटींची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. यात ऋषिराज यांनी काशीबशी सुटका केली.
Web Title: MLA’s son kidnapped, three arrested
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study