Home Maharashtra News तयारी करा! Raj Thackeray यांनी फुंकलं मनसेचं रणशिंग

तयारी करा! Raj Thackeray यांनी फुंकलं मनसेचं रणशिंग

Raj Thackeray

Raj Thackeray : आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकीची लगबग सुरु झाल्यानं सर्वच पक्ष आता जोमानं कामाला लागले आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही आज आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. मनसे भाजप युतीची चर्चा मधल्या काळात सुरू होती. मात्र भाजपनं स्वबळावर लढण्याचा निर्णय सांगितला. आता मनसेनेही महापालिका निवडणुकांसाठी स्वबळावर लढण्याची तयारी केली आहे. निवडणुकीच्या कामाला लागा, असं आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपल्या पक्षाला केलं आहे.

मुंबईतल्या वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये मनसे पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत राज ठाकरे यांच्यासह मनसेचे प्रमुख नेते उपस्थित होते. प्रत्येक विधानसभा क्षेत्रासाठी मनसे स्वतंत्र समिती स्थापन करणार असून, त्या समितीवर तिथल्या इच्छुकांचा आणि एकूणच परिस्थिचा अहवाल तयार करण्याची जबाबदारी सोपवली जाणार आहे. पक्षप्रमुख राज ठाकरे स्वतः लोकसभा क्षेत्रनिहाय मेळावे घेणार आहेत. महापालिका निवडणुकांसाठी राज ठाकरेंची रणनीती यशस्वी ठरणार का हे पहावं लागणार आहे.

२०१० आणि २०१२ साली झालेल्या महानगरपालिका निवडणुकांमध्ये मनसेने राज्यभरात मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून आणले होते. २०१० साली कल्याण डोंबिवलीत मनसेची सत्ता थोडक्यात हुकली होती. मात्र पुढे २०१२ मध्ये मनसेने नाशिक महानगरपालिकेत आपला पहिला महापौर बसवून सत्ता काबीज केली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकी पासून पक्षाला उतरती कळा लागली. यामुळं २०१५ आणि २०१७ च्या महापालिका निवडणुकीत मनसेच्या हाती मोठे यश लाभले नाही. मात्र आता आगामी काळात होणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत मनसे काय करिश्मा करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title : MNS president Raj Thackeray’s meeting in Mumbai on the backdrop of the upcoming municipal elections

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here