Home Maharashtra News “किरण मानेंनी इतर कलाकारांना त्रास दिला” – मनसे घेणार विरोधी भूमिका ?

“किरण मानेंनी इतर कलाकारांना त्रास दिला” – मनसे घेणार विरोधी भूमिका ?

mns-will-also-jump-into-the-kiran-mane-controversy

मुंबई – ‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर सुरु असलेल्या ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत वडिलांची (Vilas Patil) भूमिका निभावणारा कलाकार किरण माने (Kiran Mane) यांना मालिकेतून बाहेर केल्यापासून राज्यभर त्याचे पडसाद उमटत आहेत. सोशल मीडियातून अनेकजण त्यांच्या समर्थनार्थ पुढे येत आहेत तर काही जण त्यांच्यावर टीका देखील करीत आहेत. याच मुद्द्यावर मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांना माध्यमांनी सवाल केला असता, मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. वेळ आल्यावर याबाबत आम्ही आमची भूमिका घेऊ असं त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना म्हटलं आहे.

“मला यावर काहीही बोलायचं नाही. किरण माने यांनी मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला आहे. त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून काढण्यात आलं आहे. किरण यांचा आरोप आहे की, मी राजकीय भूमिका घेतल्याने मला कुठलीही पूर्वकल्पना न देता मालिकेतून बाहेर काढण्यात आले. यावर योगायोग कावळा बसायला आणि फांदी तुटायला एकच वेळ झाली. राजकीय भूमिकेमुळे नव्हे तर त्यांच्या वर्तणुकीमुळे त्यांना मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. या सगळ्यावर योग्यवेळ आल्यावर मनसे आपली भूमिका मांडेल” असं अमेय खोपकर यांनी म्हटलं आहे.

किरण माने यांनी या प्रकरणी शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, आता शरद पवार मी मांडलेल्या बाजुवर जे निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असेही माने यांनी म्हटलं आहे. मी शिक्क्यांना घाबरत नाही, शिक्के मारणारे हे कोण? शरद पवार हे अभ्यासू, विचारी, विवेकी आणि संयमी व्यक्तीमत्व आहे. भारतातील कला क्षेत्राचं त्यांना प्रचंड ज्ञान तसेच अभ्यास आहे. त्यांच्यासारखा दुसरा नेता देशात नाही, मी त्यांचा प्रचंड आदर करतो, म्हणून ते जर म्हणाले की, एखादी गोष्ट विचार न करता कर, तर मी ती नाही करणार, मी अंधपणे होकार नाही देत. पण, माझी बाजू त्यांच्याकडे मांडावी असे मला वाटले, म्हणून मी त्यांच्याकडे गेलो, असे किरण माने यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title : MNS will also jump into the Kiran Mane controversy

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here