Home भारत Teleprompter वरून राहुल गांधींनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली

Teleprompter वरून राहुल गांधींनी उडवली नरेंद्र मोदींची खिल्ली

Modi Teleprompter

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) सध्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या एका भाषणामुळे चांगलेच चर्चेत आले आहेत. या भाषणादरम्यान टेलिप्रॉम्टर मध्येच बंद पडल्याने पंतप्रधानांचा गोंधळ उडाला होता. या गोष्टीवरून विरोधकांनी पंतप्रधानांवर उपहासात्मक टीका करण्यास सुरुवात केलेली असताना काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे.

भारतीयांनी कोरोनाविरुद्ध कसे दोन हात केले यासंदर्भात बोलताना भारतीयांची इच्छाशक्ती चांगली आहे, असे मोदी भाषणात म्हणाले. मात्र त्यानंतर टेलिप्रॉम्टरमध्ये अचानक तांत्रिक अडचण आली आणि तो मध्येच बंद झाला. यानंतर पंतप्रधान मोदी भाषण देता देता थांबले. टेलिप्रॉम्टर हे असे यंत्र आहे जे व्यक्ती पासून थोड्या अंतरावर दूर ठेवले जाते. ज्याच्या स्क्रीनवर दिलेला मजकूर वाचून समोरचा व्यक्ती बोलत असतो. हे यंत्र टीव्ही वर बातम्या देणारे चॅनल्स मुख्यतः वापरतात.

मोदीं समोरील टेलिप्रॉम्टर मध्येच थांबल्याने ते वाचून भाषण करीत असलेले मोदी गोंधळले आणि थोड्या संतापलेल्या हावभावासहीत स्क्रीनच्या उजवीकडे पाहू लागले. नंतर त्यांनी निराश होऊन हात वर करत कानात हेडफोन लावत भाषणामध्ये झालेल्या गोंधळानंतर समोरच्यांना ऐकू येतंय का हे विचारु लागले.

अचानकपणे उदभवलेल्या या साऱ्या प्रकारामध्ये पंतप्रधान मोदी चांगलेच गोंधळलेले दिसले. टेलिप्रॉम्टर बंद झाल्यानंतर पंतप्रधानांना न अडखळता एक वाक्यही बोलता आलं नसल्याची टीका सोशल मीडियावरुन मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. ‘इतना झूट टेलिप्रॉम्टर भी नहीं झेल पाया’ असे ट्विट करत काँग्रेसच्या राहुल गांधींनी मोदींची खिल्ली उडवून दिली आहे.

Web Title : Rahul Gandhi mocks Narendra Modi on Teleprompter (Modi Teleprompter)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here