Home भारत २६ जानेवारीला पंतप्रधानांच्या जीवाला धोका ? गुप्तचर यंत्रणांना मिळाली माहिती

२६ जानेवारीला पंतप्रधानांच्या जीवाला धोका ? गुप्तचर यंत्रणांना मिळाली माहिती

modi terrorist

नवी दिल्ली : २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर देशात दहशतवादी हल्ल्याचा कट रचण्यात येत असल्याचा इशारा गुप्तचर यंत्रणांना मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबरच प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमत उपस्थित राहणाऱ्या मान्यवरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. असा इशारा देण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

एका वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या अहवालाच्या पार्श्वभूमीवर हे वृत्त दिले गेले आहे. भारताच्या ७५ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये पंतप्रधान मोदी यांच्यासह इतर मान्यवरांच्या जीवाला धोका असल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यासाठी आशिया खंडातील पाच देशांच्या मुख्य नेत्यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. यामध्ये कझाकिस्तान, तझाकिस्तान, किर्गिजस्तान, तुर्कमेनिस्तान आणि उझबेकिस्तानच्या नेत्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील काही दहशतवादी गटांकडून या हल्ल्यासंदर्भातील कट रचण्यात आल्याचे संकेत गुप्तचर यंत्रणांना मिळाले आहेत. या कटानुसार मान्यवरांबरोबरच महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे, मोठ्या इमारती आणि जास्त गर्दीच्या ठिकाणांवर हल्ला करण्याचा या दहशतवादी गटांचा कट असल्याचेही अहवालात म्हटले आहे. हे हल्ले ड्रोन्सच्या मदतीने केले जाण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे.

जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तोयबा, द रियान्सर फोर्स, हिजबुल्ल मुजाहिद्दीन आणि हरकत-उल-मुजाहिदीन सारख्या गटांचा हा कट रचण्यामागे हात असल्याचे सांगितले जात आहे. इतकेच नव्हे तर खलिस्तानवादी गटांकडूनही पाकिस्तानमध्ये या कटाच्या पार्श्वभूमीवर हलचाली सुरु झाल्याची माहिती देण्यात आली आहे. पाकिस्तान शेजारील पंजाब आणि इतर राज्यांमध्ये आतंकवादी हल्ला करण्याचा या गटांचा इरादा असल्याचे संकेत मिळत आहेत. मागील अहवालानुसार खलिस्तानी गटांकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बैठकी आणि भेटींच्या ठिकाणी हल्ल्यांचा कट रचला जात असल्याचेही संकेत मिळाले होते.

Web Title : Danger to PM’s life on January 26? Intelligence agencies received information

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here