कॉलेजवरून घरी जात असणाऱ्या तरुणीचा विनयभंग
Ahmednagar Crime | अहमदनगर: कॉलेजवरून घरी जात असणाऱ्या तरुणीचा तरूणाने हात पकडून विनयभंग (Molestation) केल्याची घटना अहमदनगर शहरातील बालिकाश्रम रोडवर घडली.
या प्रकरणी पीडित तरुणीने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून दिलेेल्या फिर्यादीवरून विनयभंग करणारा तरूण शुभम शंकर काकडे (रा. तपोवन रोड, अहमदनगर) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहमदनगर शहरातील एका उपनगरात राहणारी फिर्यादी तरुणी पारनेर तालुक्यातील एका कॉलेजमध्ये शिक्षण घेते. गुरूवारी सायंकाळी युवती व तिचे मित्र-मैत्रीण कॉलेज संपल्यानंतर बसने पारनेर येथून अहमदनगर शहरातील नेप्ती नाका येथे आले. तेथून युवती तिच्या दुचाकीवरून घराकडे जात असताना शुभम काकडे याने तिला बालिकाश्रम रोडवर दुचाकी आडवी लावली. तो तीला म्हणाला, ‘तु माझ्याशी का बोलत नाही? असे म्हणत त्याने डावा हात पकडून विनयभंग केला. तु माझ्याशी बोलली नाही तर मी तुला त्रास देईल, अशी धमकी देवुन शिवीगाळ केली व तो तेथून निघुन गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची (Crime) नोंद केली असून पुढील तपास सुरू केला आहे.
Web Title: Molestation of a young woman on her way home from college