अहमदनगर: अल्पवयीन मुलीचा विनयभंग, आरोपी २४ तासांत जेरबंद
Breaking News | Ahmednagar: अश्लील हावभाव केले व तिचा पाठलाग करुन वाईट हेतूने तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य (Molested).
कोपरगाव: अल्पवयीन मुलगी कोपरगाव बसस्थानकात बसलेली असताना आरोपी मोहसीन शेख याने तिच्याकडे पाहून अश्लील हावभाव केले व तिचा पाठलाग करुन वाईट हेतूने तिचा हात धरून तिला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. बाबत कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात बालकांचे लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत २४ तासांत आरोपी मोहसिन शेख याला जेरबंद केले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पो. नि. दिनेश आहेर यांना गुन्ह्यातील फरार आरोपींचा शोध घेऊन कारवाई करण्याबाबतचे आदेश पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिले होते. पोनि दिनेश आहेर यांनी आरोपींचे वास्तव्याबाबत माहिती घेत असताना गुप्त बातमीदाराने आरोपी मोहसिन शेख हा गांधीनगर, कोपरगाव येथे आला असल्याची खात्रीशीर बातमी दिली. प्राप्त माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास कारवाईचे आदेश दिले.
पथकाने गांधीनगर येथे जाऊन मोहसीन रियाज शेख, रा. गांधीनगर याला ताब्यात घेतले. पुढील तपास कोपरगाव पोलीस स्टेशन करत आहे. सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी केली आहे.
Web Title: Molested of minor girl, accused jailed within 24 hours
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study