भंडारदरात पुन्हा मान्सून सक्रिय, वाचा पाणीसाठा
Bhandardara Dam: तीन दिवसांपासून पुन्हा मान्सून सक्रिय झाला.
भंडारदरा: नगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोटात तिसर्या दिवशीही अधूनमधून सरी कोसळत असल्याने धरणात नव्याने पाणी जमा होत आहे. गत 12 तासांत धरणात 114 दलघफू पाण्याची आवक झाली. त्यामुळे 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल गुरूवारी सायंकाळी 10909 दलघफू (98.82 टक्के) झाला आहे. आज हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्याची शक्यता आहे.
पाणलोटात पाऊस कमी झाल्याने दहा दिवसांपासून आवक कमालीची घटली होती. पण तीन दिवसांपासून पुन्हा मान्सून सक्रिय झाला आहे. बुधवारी घाटघर येथे 81 मिमी पाऊस पडला. गुरूवारी घाटघर 70 आणि रतनवाडीत 65 मिमी पाऊस पडला. त्यामुळे धरणात पाण्याची धीम्या गतीने का होईना आवक वाढू लागली आहे. या पावसामुळे डोंगरदर्यांमधील धबधबे तसेच ओढे नाले वाहु लागले आहेत. भंडारदरात अधूनमधून पाऊस होत असल्याने वाकी तलावातून 98 क्युसेकचा ओव्हरफ्लो सुरू झाला आहे. पाऊस सुरूच राहिल्यास पूर्ण क्षमतेने धरण भरण्यात येऊन पाणी प्रवरा नदी पात्रात सोडण्यात येण्याची शक्यता आहे.
Web Title: Monsoon active again in Bhandardara
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App