मान्सून वेळेत, मान्सून अंदमानात दाखल, कोकणात धडकणार या दिवशी
मुंबई | Monsoon: चक्री वादळ धडकल्यानंतर नागरिक मान्सूनची वाट पाहत आहे. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार २१ मे रोजी अंदमानात दाखल होणार असा अंदाज दर्शविला होता. त्यानुसार वेळेतच मान्सून अंदमानात दाखल झाला आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जून रोजी केरळमध्ये मान्सून दाखल होणार आहे. सध्या मान्सूनसाठी पोषक वातावरण झाले आहे. परिणामी जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळात दाखल होणार आहे. त्यानंतर १० जूनपर्यंत कोकणात मान्सून हजेरी लावू शकतो. त्यानंतर १५ ते २० जून दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात पाउस बरसेल असा अंदाज वर्तविला आहे.
दरम्यान नैऋत्य मोसमी वारे हे अंदमान बेटांवर पोहोचले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाच्या पट्ट्याचं क्षेत्र तयार झाले आहे. त्यामुळे निकोबार बेट, बंगालचा उपसागर, संपूर्ण अंदमान आणि उत्तर अंदामानाच्या काही भागात मान्सून बरसेल व पुढील 48 तास सरी बरसत राहतील असे सांगण्यात आले आहे.
Web Title: Monsoon arrives in Andaman