ब्रेकिंग! मान्सून ४८ ते ७२ तासांत राज्यात येण्याची शक्यता
Monsoon Update: आज कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेशात प्रवेश; हवामान विभागाचा अंदाज.
Monsoon Update news in Maharashtra: केरळमध्ये मान्सून यंदा ३० मे रोजीच दाखल झाला. मात्र ४८ तास तो तेथेच अडखळला होता. रविवारी त्याने पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतल्याने राज्यात वेळेवर हवामान शास्त्रज्ञांच्या मते रविवारी पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतला. त्याने तीन राज्ये एकाच केरळमध्ये अडखळलेला मान्सून रविवारी कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशात दाखल झाला. पश्चिमी वाऱ्यांनी वेग घेतल्याने तो तळकोकणासह पुणे, मुंबई बहुतांश भागात ४८ ते ७२ तासांत येऊ शकतो, असा अंदाज हवामान ७० विभागाने दिला आहे.
गती घेतली आणि कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशातील काही भाग व्यापला. तसेच अरबी समुद्रासह ईशान्य भारतात त्याची प्रगती सुरू आहे. उत्तर भारतात अजून दोन ते तीन दिवस उष्मा राहील. त्यानंतर वेगाने मान्सून विहारमध्ये दाखल होताच उष्णतेची लाट कमी होण्याचा अंदाज आहे.
महाराष्ट्रात आगामी दोन ते तीन दिवसांत म्हणजे ४८ ते ७२ तासांत दाखल होऊ शकतो.
राज्याचे कमाल तापमान…
ब्रह्मपुरी ४६.५, चंद्रपूर ४५, गोंदिया ४४.९, नागपूर ४५.४, वाशिम ४२.६, वर्धा ४६, यवतमाळ ४४.५, मुंबई ३५.१, पुणे ३७.२, अहमदनगर ४०.२, जळगाव ४०.९, कोल्हापूर ३४.२, महाबळेश्वर २८.७, मालेगाव ४२.६, नाशिक ३६.५, सांगली ३६.४, सातारा ३५.९, सोलापूर ४०.२, धाराशिव ३९.२, छत्रपती संभाजीनगर ४०, परभणी ४२.२, नांदेड ४०.२, अकोला ४३.५, अमरावती ४४.६, बुलडाणा ३८.८.
पश्चिमी वाऱ्यांनी रविवारपासून वेग घेतल्याने मान्सून आता महाराष्ट्राच्या दिशेने निघाला आहे. आगामी ४८ ते ७२ तासांत तो तळकोकणासह राज्यातील काही भाग व्यापण्याची शक्यता आहे. सोमवार दि. ३ जूनपासून राज्यात सर्वत्र मान्सून पूर्व पावसाला सुरुवात होणार आहे. त्यातच मान्सून दाखल होईल. – डॉ. अनुपम कश्यपी, निवृत्त हवामान विभागप्रमुख, पुणे.
पुढील पाच दिवस महाराष्ट्रात मध्यम पावसाचा अंदाज
३ जूनपासून राज्यात सर्वत्र कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे; तर सिक्कीम आणि मणिपूरमध्ये पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यासोबत बिहार, झारखंड, ओडिशा, छत्तीसगड, विदर्भ मराठवाडा, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागामध्ये पुढील पाच दिवस हलका ते मध्यम पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
Web Title: Monsoon is likely to arrive in the state in 48 to 72 hours
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study