Monsoon: राज्यात पुढील 48 तासात मान्सून कोकणात दाखल होणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. कोकणात मान्सूनच्या आगमनासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. कर्नाटकमध्ये अडकलेली मान्सूनची गाडी अखेर कोकणात येणार आहे.
परिस्थिती अनुकूल झाल्याने मान्सून कोकणात पोहोचणार असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील शेतकरी मान्सूनच्या आगमनाची वाट बघत आहेत. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर पुढच्या 4 दिवसात मान्सून महाराष्ट्राच्या अन्य भागात पोहोचण्याची शक्यता आहे. पुढील 48 तासात मान्सूनचे नैऋत्य वारे पुढे सरकरतील असे सांगण्यात आले आहे. तळकोकणात पुढच्या 48 तासात मान्सून दाखल होणार आहे.
तर दुसऱ्या ठिकाणी काही ठिकाणी एकूण 27 जिल्ह्यात उष्णतेची लाट असल्याची स्थिती देखील आहे. यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 4 दिवसात मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात देखील अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
के. एस. हौसाळीकर यांनी ट्वीट द्वारे दिलेली माहिती:
पुढील ४८ तासांत, मध्य अरबी समुद्राच्या आणखी काही भागात, गोवा,दक्षिण महाराष्ट्राचा काही भाग, कर्नाटक आणखी काही भाग, TN चा उरलेला भाग,दक्षिण AP चा काही भाग, WC & NW BoB च्या आणखी काही भागात मान्सूनसाठी परिस्थिती अनुकूल. त्यापुढील 2 दिवसांत महाराष्ट्राच्या आणखी भागात मान्सूनसाठी अनुकूल
Web Title: monsoon will reach Konkan in the next 48 hours