अहिल्यानगर: : जिल्ह्यातील बहुतांश भागात पहाटेच बरसला अवकाळी
Ahilyanagar Rain Update: हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा पिकाचे नुकसान होण्याचा धोका.
अहिल्यानगर: जिल्ह्यात गेल्या चार-पाच दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. जिल्ह्यातील बहुतांश भागात शुक्रवारी पहाटे ३ वाजल्यापासून पावसाला सुरूवात झाली.
हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसामुळे रब्बी हंगामातील गहू, कांदा पिकाचे नुकसान होण्याचा धोका आहे. श्रीगोंदे, कर्जत आणि जामखेड हे तीन तालुके वगळता इतर तालुक्यांत पाऊस झाला.
दरम्यान, या पावसामुळे कोठेही जीवित किंवा वित्तहानी झालेली नाही, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉ. रवींद्र बडदे यांनी सांगितले. राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. धुके आणि पाऊस एकत्र झाल्याचं पाहायला मिळतं.
आग्नेय अरबी समुद्र तसेच लक्षद्वीप बेट समूह याठिकाणी कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्याचबरोबर थायलंड परिसरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र बंगालचा उपसागर आणि अंदमान समुद्रात आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रासह मध्यभारतात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यातील अनेक मंडलांत पावसाचा तडाखा
नगर तालुका : नालेगाव ६.५, सावेडी ८, कापूरवाडी ८, केडगाव ७.३, भिंगार १.५, नागापूर ६.३, जेऊर ११.८, चिचोंडी ३, वाळकी १.५, चास २३.८, रूईछत्तीशी १, नेप्ती ३३.३.
पारनेर : भाळवणी १७.५, पळशी १५,
श्रीगोंदे : मांडवगण-०८, कर्जत कोंभळी ३,
शेवगाव : शेवगाव ०.८, भातकुडगाव ०.८, बोधेगाव २.३, चापडगाव २.३, ढोरजळगाव ३.५, एरंडगाव ६.८, दहिगावने ५.३, मुंगी ७. ३.
पाथर्डी : पाथर्डी २.५, माणिकदौंडी ९.५, टाकळी १, कोरडगाव ४.५, करंजी ४.८, मिरी १०.
नेवासा : नेवासा खुर्द ४.५, नेवासा बुद्रुक ८.५, सलाबतपूर ६.८, कुकाणा ०.८, चांदा ९, घोडेगाव ९, सोनई ८.८, वडाळा ४.५, प्रवरासंगम ४.३, देवगड १.५.
राहुरी : राहुरी १४.३, सात्रळ ३४.५, ताहराबाद १२, देवळाली १०.८, टाकळीमियाँ १४.३, ब्राह्मणी ७, वांबोरी ६.३, बारागाव नांदूर १९.
संगमनेर : संगमनेर ८, धांदरफळ १०, आश्वी २०.५, शिबलापूर २०.५, तळेगाव १९.५, समनापूर ३४.८, डोळसणे १३.३. साकूर १३.३, पिंपळणे १६.८,
अकोले : अकोले १०, वीरगाव ५.५, समशेरपूर ३, साकेवाडी ०.३, राजुर १.३, शेंडी १.३, कोतूळ १.५, ब्राह्मणवाडा ०.३, वाकी ०.८,
कोपरगाव : कोपरगाव २९, रखांदे १२.३, सुरेगाव १२.३, दहिगाव १६.५, पोहेगाव १३.३, कोकमठाण २.३,
श्रीरामपूर :श्रीरामपूर ६.५, बेलापूर ११.८, टाकळीभान ३.५, उंदिरगाव १६.३, कारेगाव ९.५,
राहाता : राहाता १६, शिर्डी ७, लोणी १०.८, बाभळेश्वर १६, पुणतांबा १९.३, अस्तगाव १४ मिमी पावसाची नोंद झाली.
Web Title: most parts of the district, it rain early in the morning
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study