आईनेच केला दोन चिमुरड्याचा गळा दाबून खून, पतीवर हल्ला
Daund Crime: आईनेच अडीच वर्षांच्या मुलीला आणि एक वर्षाच्या मुलाला गळा दाबून खून केला आहे. त्याचबरोबर पतीच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार.
दौंड : दौंडमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. जन्मदात्याने आईनेच मुलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना पाटससध्ये घडली आहे. दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील मिंढे वस्ती आईनेच अडीच वर्षांच्या मुलीला आणि एक वर्षाच्या मुलाला गळा दाबून खून केला आहे. त्याचबरोबर पतीच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. घरगुती वादातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली.
मुलगी पिऊ दुर्योधन मिंढे (वय अडीच वर्षे), मुलगा शंभू दुर्योधन मिंढे (वय एक वर्षं ) या चिमुकल्यांच्या गळा दाबून आईनेच खून केला आणि नंतर पती दुर्योधन बाळासाहेब मिंढे याच्या मानेवर आणि डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केले. यामध्ये पती गंभीर जखमी असून त्याला बारामती येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
आरोपी महिलेला एकाच वेळी संपूर्ण कुटुंब संपवायचं होते, असंच यातून दिसून येते. ही घटना शनिवारी (दि 08) पहाटे 4 वाजण्याच्या आसपास घडली. दुर्योधन यांची पत्नी कोमल दुर्योधन मिंढे हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. घटनेची माहिती मिळताच दौंड उपविभागीय पोलिस अधिकारी बापूराव दडस, दौंड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतले असून अधिक तपास दौंड पोलीस करीत आहेत.
Web Title: mother herself strangulated two children, attacked her husband
See also: Latest Marathi News, Breaking News live, Sangamner News, Ahmednagar News