अहमदनगर: सासू सुनेला गजाने मारहाण, गुन्हा दाखल
अहमदनगर| Ahmednagar Crime: जागा नावावर करून देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ करत सासू-सुनेला लोखंडी गजाने मारहाण केल्याची घटना घडली आहे. या मारहाणीत सासू रूकसाना चारलस चव्हाण (वय 40) व त्यांची सुन तेजस सुरज चव्हाण (दोघी रा. समर्थनगर, भोसले आखाडा, बुरूडगाव रोड, अहमदनगर) जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास भोसले आघाडा परिसरात ही घटना घडली. याप्रकरणी रूकसाना चव्हाण यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून फिर्यादीवरून चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवारी दुपारी आरोपींनी फिर्यादी यांना, ‘तु राहत असलेली जागा माझ्या नावावर करून दे’, असे म्हणाले असता. फिर्यादी यांनी त्याला नकार दिला असता फिर्यादी यांना आरोपींनी लोखंडी गजाने डोक्यात मारून जखमी केले. फिर्यादी यांची सुन त्यांना सोडण्यास गेली असता आरोपींनी फिर्यादी व त्यांच्या सुनेला शिवीगाळ करून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, असे फिर्यादीत म्हटले आहे.
सिल्व्हर झेंडे चव्हाण, वगैबाई सिल्व्हर चव्हाण, लक्ष्मण सिल्व्हर चव्हाण व सुनील सिल्व्हर चव्हाण (सर्व रा. समर्थनगर, भोसले आखाडा) यांच्याविरूध्द हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील तपास कोतवाली पोलीस करीत आहेत.
Web Title: Mother-in-law Sunela beaten up, Crime filed