Home Crime News मुलाला छातीशी कवटाळून महिलेने पंधराव्या माळ्यावरून मारली उडी

मुलाला छातीशी कवटाळून महिलेने पंधराव्या माळ्यावरून मारली उडी

Mother Son Suicide

मुंबई – आई आणि मुलाच्या आत्महत्येप्रकरणी दोन जवळच्या नातेवाईकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. आत्महत्या केलेल्या श्रुती महाडिक यांचा चुलत दीर सचिन महाडिक आणि चुलत सासरा किशोर महाडिक या दोघांनाही पोलिसांनी आता अटक केलेली आहे. लेकासह आईला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप या दोन्ही पितापुत्रावर आहे.

घरगुती कारणावरुन छळ होत असल्याचा आरोप श्रुतीने आत्महत्येपूर्वी सुसाईड नोटमध्ये केला होता. चेंबुरमधील अल्टा विस्टा इमारतीच्या जवळ असलेल्या नाल्यातील गाळात मायलेकराचा मृतदेह शुक्रवारी रुतलेला सापडला. श्रुतीने आपल्या साडेतीन वर्षांचा मुलगा राजवीरसह इमारतीच्या पंधराव्या मजल्यावरुन उडी मारल्याची धक्कादायक घटना समोर आल्याने एकच खळबळ माजली होती.

कुर्ल्याला वास्तव्यास असणाऱ्या विवाहितेने आपल्या माहेरी येऊन हे टोकाचे पाऊल उचलले होते. (Mother Son Suicide) दोघेही मायलेक बुधवारपासून मुंबईतील कुर्ला भागातून बेपत्ता असल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबीयांनी पोलिसात नोंदवली होती. त्यानंतर दोघांचा शोध सुरु होता. मात्र त्यांचा कुठेच थांगपत्ता लागत नव्हता. पोलिसांनी सीसीटीव्ही तपासल्यानंतरही त्यांचा ठिकाणा लागत नव्हता. मात्र चेंबुरमधील अल्टा विस्टा इमारतीच्या जवळ असलेल्या नाल्यातून दोन सेकंद उडालेल्या पाण्याने गूढ उकलले आणि पोलिसांनी त्या दृष्टीने शोध घेतला असता त्यांचा अंदाज खरा ठरला.

Web Title : The woman grabbed the child by the chest and jumped from the 15th floor

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here