मुलीस पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणासह आईला अटक
Breaking News | Ahmednagar: अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या तरुणाला व त्याला मदत करणाऱ्या त्याच्या आईस राहुरी पोलिसांनी अटक केल्याची घटना.
राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील अल्पवयीन मुलीस पळवून नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार (abused) करणाऱ्या तरुणाला व त्याला मदत करणाऱ्या त्याच्या आईस राहुरी पोलिसांनी अटक केली आहे.
राहुरी तालुक्यातील संक्रापूर येथिल तरुण विश्वास संतोष मकासरे (वय 20) याने परिसरातील अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेले. पळवून आणलेल्या मुली बरोबर आपल्या मुलास लग्न करता यावे या उद्देशाने विश्वास संतोष मकासरे याच्या आईने आपल्या मुलास अल्पवयीन मुली बरोबर लैंगिक अत्याचार व अनैतिक कृत्य करण्यास मदत केल्याचे तपासात समोर आले. सदर गुन्ह्यात भारतीय दंड विधान संहितेचे कलम 366 अ वाढवण्यात आले असून पळवून नेण्यास प्रोत्साहन देणाऱ्या मुलाची आई-नामे वैशाली संतोष मकासरे (वय 45) हिला अटक करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, विभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश चव्हाण, साहय्यक पोलिस उप निरीक्षक ज्ञानदेव गर्ने, पोलीस हवालदार शेळके पोलीस हवालदार वैराळ यांच्या पथकाने कारवाई केली.
Web Title: mother was arrested along with the young man who abducted the girl and sexually assaulted her
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study