Home नागपूर आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार | Raped

आईच्या प्रियकराचा मुलीवरही बलात्कार | Raped

Breaking News | Nagpur Crime:  प्रेयसीला घराबाहेर काढून तिच्या मुलीवर बलात्कार (Raped).

Mother's boyfriend also raped her daughter

नागपूर: एका हत्याकांडात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या कैद्याने पॅरोलवर बाहेर येताच विवाहित प्रेयसी महिलेवर बलात्कार (Rape) केला. त्यानंतर प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवरही त्याची नजर फिरली. प्रेयसीला घराबाहेर काढून तिच्या मुलीवर बलात्कार केला. प्रेयसीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.

कुणाल भारत गोस्वामी (३३) रा. जरीपटका, असे अटक केलेल्या नराधमाचे नाव आहे.

याबाबत अधिक सविस्तर  माहिती अशी की, कुणाल गोस्वामी हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर अनेक गुन्हे नोंद आहेत. २०१४ मध्ये कुणाल आणि त्याच्या साथीदारांनी पप्पू काळे नावाच्या गुडांचा भरचौकात चाकूने भोसकून खून केला होता. या प्रकरणात न्यायालयाने कुणाल आणि त्याच्या साथीदारांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. पीडित महिला आणि कुणाल शेजारी होते. त्यामुळे त्यांच्यात ओळख होती. त्यानंतर त्यांच्यात प्रेमसंबंध निर्माण झाले. पती घरी नसताना कुणाल महिलेशी शारीरिक संबंध ठेवत होता. गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात कुणाल पॅरोलवर तुरुंगातून बाहेर आला. तो प्रेयसीला भेटाण्यास तिच्या घरी गेला.

यावेळी जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. महिलेच्या गैरहजेरीतही तो तिच्या घरी जात होता. या दरम्यान त्याची प्रेयसीच्या १५ वर्षीय मुलीवर वाईट नजर पडली. त्याने तिला शारीरिक संबंधाची मागणी केली. तिने नकार देताच तिच्या आईशी असलेले प्रेमसंबंध वडिलाला सांगण्याची धमकी दिली. त्यामुळे नाईलाजास्तव मुलीने होकार दिल्याने त्याने लैंगिक अत्याचार केला. याबाबत वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे ती गप्प राहिली.

10 वी व 12 विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त इंग्रजी शिका –  Education Portal 

जानेवारी २०२४ ला तो पुन्हा तुरुंगातून पॅरोलवर बाहेर आला. महिलेच्या घरी जाऊन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापीत केले. त्यानंतर त्याने मुलीलाही संबंधाची मागणी केली. विरोध केला असता तिच्याशी बळजबरी शारीरिक संबंध प्रस्थापित केले आणि धमकावून निघून गेला. मुलीने आईला घटनेची माहिती दिली. कुणालने यापूर्वीही जबरीने अत्याचार केल्याचे सांगितले. महिलेने प्रकरणाची तक्रार पोलिसात केली. पोलिसांनी आरोपी कुणालवर लैंगिक अत्याचार आणि पोक्सो अॅक्टसह विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून त्याला अटक केली. कुणाल विरुद्ध घरफोडी, लोकांना धमकावणे, खून व इतर गंभीर स्वरुपाचे गुन्हे नोंद असल्याने कोणीही त्याच्या विरुद्ध तक्रार करीत नव्हते. यामुळे त्याची हिंमत वाढली होती. पॅरोलवर सुटल्यानंतर तो सतत महिलेचे लैंगिक शोषण करीत होता. मात्र मुलीचे लैंगिक शोषण (abused) करीत असल्याचे समजताच तिने पोलीस स्टेशन गाठून तक्रार दाखल केली.  

Web Title: Mother’s boyfriend also raped her daughter

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here