संगमनेर: डोंगर पेटला; शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू, एक गाय ठार
Breaking News | Sangamner: डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गाईसह शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू.
घारगाव : डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गाईसह शेतकऱ्याचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. १८) संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील म्हसवंडी गावच्या परिसरात घडली. सीताराम तुकाराम जाधव (रा. जाधव वस्ती, म्हसवंडी) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.
सीताराम जाधव यांची जनावरे चरण्यासाठी वन विभागाच्या हद्दीत गेली होती. जनावरांना आणण्यासाठी ते गेले असता, मंगळवारी दुपारी डोंगराला अचानक आग लागली. मोठ्या प्रमाणात आग पसरल्याने जाधव हे आगीत अडकले. गंभीर भाजल्याने त्यांच्यासह एका गाईचा मृत्यू झाला. दुसरीही गाय गंभीररीत्या भाजली. संध्याकाळ होऊनही जाधव घरी न परतल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला. बुधवारी (दि. १९) सकाळी पुन्हा कुटुंबीयांनी त्यांचा शोध सुरू केला असता, जळालेल्या अवस्थेत जाधव आणि एका गाईचा मृतदेह आढळून आला. जवळच एक गाय गंभीररीत्या भाजलेली दिसून आली.
जाधव यांच्या विभागाने मदत करावी सरपंच मंगेश बोडके घटनेची माहिती ठाण्याचे पोलिस भदाणे, पोलिस कुटुंबाला वन , अशी मागणी यांनी केली आहे. मिळताच घारगाव निरीक्षक दिगंबर हवालदार ज्ञानेश्वर मरभळ, प्रमोद गाडेकर हे घटनास्थळी पोहोचले.
Web Title: Mountain catches fire farmer dies of burns, one cow killed