Home अहमदनगर अहिल्यानगर: चालत्या आलिशान कारने पेट घेतल्याने कार जळून खाक

अहिल्यानगर: चालत्या आलिशान कारने पेट घेतल्याने कार जळून खाक

Breaking News | Ahilyanagar Car Fire: घाटात एका आलिशान कारने पेट घेतल्याने कार जळून खाक.

moving luxury car catches fire and the car burns down

पाथर्डी : तालुक्यातील माणिकदाडा घाटात एका आलिशान कारने पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळी पाथर्डी तालुक्यातील केळवंडी शिवारात बारामती-पैठण या राज्य महामार्गावर माणिकदौंडीच्या घाटात ही आगीची घटना घडली. सुदैवाने आगीत कोणालाही इजा झाली नाही.

गाडी मालक धनंजय चंद्रकांत गिराम (वय २९, रा. भाग्यनगर, बीड) हे व त्यांचे एक मित्र बीएमडब्ल्यू (एम.एच.१२ जी.आर ९२१८) कारने बीडवरून पुणे येथे अंमळनेर मार्गे जात होते. केळवंडी व रांजणी या शिवारात रस्ता खराब असल्याने गिरम हे येथून गाडी वळून परत जात असताना माणिकदौंडी घाटात गाडीच्या समोरील बोनटमधून धूर निघू लागला. माणिकदौंडी घाटात आलिशान कारने पेट घेतल्याने कार जळून खाक झाली. प्रसंगावधान राखून गाडीतील दोघेही गाडी थांबवून गाडीखाली उतरले. गाडीचे बोनट उघडले त्यावेळी आतील बाजूस गाडीने पेट घेतला. दोघांनी आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. परंतु अचानकपणे आगीने क्षणभरातच पेट घेतला. आगीची माहिती मिळताच पाथर्डी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने येऊन गाडीला लागलेली आग शमविली. परंतु तोपर्यंत गाडी पूर्णपणे जळून खाक झाली होती. या प्रकरणी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिस हेडकॉन्स्टेबल सुहास गायकवाड पुढील तपास करीत आहेत.

Web Title: moving luxury car catches fire and the car burns down

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here