ब्रेकिंग! धारदार शास्त्राने वार करून मनपा कर्मचाऱ्याचा खून
Breaking News | Nashik Crime: मनपा कर्मचारी याचा धारदार शास्त्राने वार करून खून केल्याची घटना.
नाशिक : मंगळवारी (दि.३०) रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास गोदाकाठावरील बालाजी कोट या ठिकाणी मनपा कर्मचारी सनी जॉन मायकल (३६, रा. बोधलेनगर) याचा धारदार शास्त्राने वार करून खून करण्यात आला. रक्तबंबाळ अवस्थेत सनी ला शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला.
सनी आपल्या मित्रांसोबत दुचाकीने पान टपरीवर जात होता. यावेळी समोरून येणाऱ्या एका दुचाकीला सनीच्या गाडीचा या धक्का लागला. यावरून सनी चे मित्र व समोरील दुचाकीस्वार यांच्यात शाब्दिक वाद झाला. त्यानंतर हे दोघे पण दुकानावर पुन्हा भेटले त्या ठिकाणी पुन्हा शाब्दिक वाद झाला. यानंतर त्यांनी आपल्या मित्रांना बालाजी कोट या ठिकाणी दारू पिण्यासाठी बोलावून घेतले. तेथे अज्ञात टोळके आले त्यांनी सनी वर धारधार शस्त्राने हल्ला केला. पोटात वर्मी घाव लागल्याने गंभीरपणे जखमी होऊन तो मृत्युमुखी पडला.
या घटनेची माहिती मिळताच सरकारवाडा, भद्रकाली, पंचवटी पोलीस ठाण्याचे फिरते गस्ती पथके व पोलीस अधिकारी यांचा फौजफाटा घटनास्थळी दाखल झाला. तातडीने रक्तबंबाळ सनी ला शासकीय जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. गंभीरपणे जखमी झाल्याने त्यास वैद्यकीय अधिकारी यांनी तपासून मयत घोषित केले. याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत सरकारवाडा पोलिसांकडून हल्लेखोरांचा शोध घेतला जात होता.
सनी हा सातपूर मनपा विभागीय कार्यालयातील अतिक्रमण विभागात नोकरीला होता त्याचा अचानकपणे अशा पद्धतीने धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याने बोलले नगर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Web Title: Municipal employee killed by stabbing with a sharp knife
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study