शारीरिक संबंधास नकार दिल्याने डोक्यात रॉड घालून महिलेची निर्घृण हत्या
Pune Crime: शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेचा खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली, दोघांना अटक.
पुणे: पुणे येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. शरीर संबंधास नकार दिल्याने महिलेचा खून केल्याची भयंकर घटना पुण्यातील बिबवेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. मृत महिलेची अद्याप ओळख समोर आलेली नाही.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शहरातील बिबबेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शत्रुंज मंदिर चौक ते गंगाधाम चौक या मार्गावरील एका गार्डन जवळ एका पालामध्ये महिलेचा मृतदेह (Dead body) आढळला होता. या प्रकरणी बिबबेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. प्रकरणाचा तपास करताना महिलेने शरीर संबंधास (Physical Relation) विरोध केल्याने दोघांनी ही हत्या केल्याचे समोर आले आहे.
दोघे आरोपी दारू पिऊन पालामध्ये झोपण्यासाठी आले होते. त्यावेळी संबंधित महिलाही त्याच पालामध्ये होती. दारुच्या नशेत असलेल्या दोघांनी महिलेवर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिलेने विरोध केला. त्याचाच राग आल्याने आरोपीने महिलेच्या डोक्यात रॉड घातला यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू (Death) झाला.
गुन्हे शाखेच्या युनिट पाचने तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे, तसेच परिसरातील सीसीटिव्हीद्वारे तपास करत आरोपींना अटक केली आहे.
रवी सिंग राजकुमार चितोडीया आणि विजय मारुती पाटील अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. दरम्यान, मृत महिलेची ओळख अद्याप पटली नसून पोलीस याबाबतचा अधिक तपास करत आहेत.
Web Title: Murder a woman with a rod on her head for refusing physical intercourse
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App