Home Crime News Murder Case: प्रेयसीच्या हत्या करणाऱ्या प्रियकराला अटक

Murder Case: प्रेयसीच्या हत्या करणाऱ्या प्रियकराला अटक

Murder Case Boyfriend arrested for murdering girlfriend

मुंबई | Murder Case: सतत पैसे मागणाऱ्या प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची घटना घडली आहे. प्रियकराला गुन्हे शाखेच्या पोलिसांनी काही तासांतच अटक केली. बिपीन विनोद कंडूलना वय २१ असे आरोपीचे नाव आहे. तर इशिता कुंजुर असे मयत प्रेयसीचे नाव आहे.

आरोपी हा बांद्रा येथील लालमाती झोपडपट्टी, रंगशारदा हॉटेलजवळ राहतो. बिपीन आणि इशिता यांची दीड वर्षापासून फेसबुकच्या माध्यमातून ओळख झाली. ओळखीतून मैत्रीत रुपांतर झाले. मग एकमेकांच्या प्रेमात पडले. आरोपी बिपीन हा बांद्रा येथील एका हॉटेलमध्ये काम करतो. इशिता घरकाम करते. रविवारी रात्री इशिता ही बिपिनच्या घरी गेली होती. त्यावेळी तिने बिपीनकडे दीड लाखांची मागणी केली. पैसे दिले नाहीतर तुला बलात्काराच्या खोट्या आरोपाखाली अडकविल अशी धमकी बिपिनला दिली. यानंतर बिपीनने इशिताला समजविण्याचा प्रयत्न केला. आणि दोघे रात्री बिंद्रा रिक्लेमेशन येथे फिरायला गेले. इशिता ऐकण्यास तयार नव्हती. बांद्रातील सेंट फ्रान्सिस्को परिसरात आल्यावर इशिता पुन्हा पैशाची मागणी करू लागली. यावेळी इशिताने आपले कपडे फाडले व मोठमोठ्याने आरडाओरडा करू लागली.  या कारणामुळेच बिपीनने इशिताची हत्या केली. 

Web Title: Murder Case Boyfriend arrested for murdering girlfriend

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here