Home अहमदनगर Murder जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : पतीने चाकूने वार करीत पत्नीचा खून

Murder जिल्ह्यातील सर्वात मोठी बातमी : पतीने चाकूने वार करीत पत्नीचा खून

Murder Case Husband stabs wife to death

कर्जत | Murder: कर्जत तालुक्यात राशीन येथे धक्कादायक घटना घडली आहे. पतीने पत्नीवर चाकूचा हल्ला केल्याने  पत्नीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना घडली आहे. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली आहे. याप्रकरणी मयताच्या बहिणीने दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसात  गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राशीन येथील श्री जगदंबा मंदिर परिसरात ही धककादायक घटना घडली आहे. पती राहुल सुरेश भोसले याने सकाळी पत्नीवर चाकूने जोरदार हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने दिपाली भोसले यांचा मृत्यू झाला. या  घटनेने तालुका हादरला आहे.

पत्नीवर चाकूने हल्ला करून पती राहुल भोसले हा पसार झाला आहे. आरोपीला पकडण्यासाठी पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडून ग्रामसुरक्षा यंत्रणेचा कॉल देण्यात आला. मात्र आरोपी ग्रामस्थांच्या हाती आलेला नाही.

अहमदनगर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील अपडेट बातम्या वाचण्यासाठी आजच डाऊनलोड करा आमचा अॅप: संगमनेर अकोले न्यूज 

कर्जत पोलिसांची पथके आरोपीचा शोध घेण्यासाठी रवाना करण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. 

Web Title: Murder Case Husband stabs wife to death

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here