Murder Case: भर चौकात शस्त्राने वार करून तरुणाचा निर्घुण खून
नेवासा | Murder Case: नेवासा तालुक्यातील चांदा येथे गुरुवारी रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास भर चौकात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करत त्याची खून केल्याची घटना घडली आहे. दुचाकीहून आलेल्या दोघांनी सपासप वार केले.
ज्ञानदेव सोपान दहातोंडे वय ४० रा. चांदा ता. नेवासा असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे,
याबाबत अधिक माहिती अशी की, ज्ञानदेव हे रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास चांदा येथील नदी चौकात मित्रासोबत बोलत उभा होता. त्यावेळी दोघे जण दुचाकीवरून येत एकाने दुचाकीवरून उतरून दहातोंडे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. त्यानंतर हल्लेखोर तेथून पसार झाले. त्याच्या मानेवर वार करण्यात आले. तेथे रक्ताचा सडा पडला होता. त्यानंतर त्यास रुग्णालयात नेत असताना त्याचे निधन झाले. पोलीस पाटील यांनी सोनई पोलिसांना माहिती देताच अप्पर पोलीस अधीक्षक दिपाली काळे, उपविभागीय पोलीस अधीक्षक सुदर्शन मुंढे, सहायक पोलीस निरीक्षक रामचंद्र कर्पे घटनास्थळी हजर झाले. याप्रकरणी पोलिसांनी एकास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. पोलीस अधिक तपास करीत आहे.
Web Title: Murder Case of a youth by attacking him with a weapon