Home Ahmednagar Live News अगोदर प्रेयसीचा खून, नंतर दुसरे लग्न, अन सराफाचा खून करून मृतदेह पुरला

अगोदर प्रेयसीचा खून, नंतर दुसरे लग्न, अन सराफाचा खून करून मृतदेह पुरला

murder Case of the beloved then the second marriage and saraph

Murder Case: शिरूर कासार येथील सराफाच्या हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड याचा पोलीस तपास सुरु असताना केतन लोमटे (रा. शिरूर कासार जि.बीड) याच्या मदतीने यांनीच शीतल भामरे या तरुणीचा खून केला असल्याचे उघड झाले आहे.  ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड याने दोन हत्या केल्याचे समोर आले आहे.

आरोपी ज्ञानेश्वर उर्फ भैय्या गायकवाड याचे मूळ गाव भातकुडगाव ता, शेवगाव येथील रहिवासी आहे. गावातील मुलींची छेड काढत असल्याच्या कारणाने घरच्यांनी त्याला मामाकडे शिरूर कासर जि. बीड येथे पाठविले. सोशियल मेडियाच्या माध्यमातून शीतल भामरे ही विवाहित महिला व ज्ञानेश्वर यांची ओळख झाली. तिला दोन मुले होती. त्या दोघांमध्ये प्रेमसंबंध जोडले गेले. सहा महिन्यापूर्वी शीतल भामरे हिने शिरूर कासार गाठले. दोघे एकत्र राहत होते. चारित्र्याच्या संशयावरून त्रास सुरु झाल्याने तिने पुन्हा नाशिकला जाण्याची तयारी केली. नाशिकला जात असताना ज्ञानेश्वर व त्याचा मित्र केतन लोमटेच्या मदतीने राहुरी कारखान्याजवळ प्रेयसी शीतलचा डोक्यात दगड घालून खून केला. याप्रकरणी पोलीस उपाधीक्षक संदीप मिटके या खुनाचा तपास करीत होते मात्र तरुणीची ओळख पटत नव्हती.

दरम्यान आरोपी ज्ञानेश्वरणे एप्रिल महिन्यात दुसऱ्या मुलीशी लग्न केले. पत्नीला दागिने देण्यासाठी सराफ विशाल सुभाष कुलथे वय २५ रा. शिरूर कासार यास दागिने घेऊन घरी बोलाविले. त्याचाही १५ दिवसांपूर्वी खून केला. विशालचा मृतदेह आरोपीने मामाच्या दुचाकीहून भातकुडगाव ता. शेवगाव येथे शेतात नेऊन पुरला. आरोपी ज्ञानेश्वरने दोन खून केले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: murder Case of the beloved then the second marriage and saraph

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here