Home क्राईम मित्रांसाठी चकना घेऊन गेला तो परतलाच नाही, मृतदेह पुरला

मित्रांसाठी चकना घेऊन गेला तो परतलाच नाही, मृतदेह पुरला

Crime News: एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना समोर.

Murder Case took chakra for his friends and did not return, buried the body

मुंबई: भिवंडी शहरात एका 16 वर्षीय अल्पवयीन मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.  पूर्ववैमनस्यातून या तरुणाची हत्या झाली असल्याची माहिती समोर येत आहे.  या तरुणाची हत्या करून मृतदेह काल्हेर येथील खाडीकिनारी निर्जनस्थळी गाडण्यात आले होते. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी चौकशी करत दोघांना ताब्यात घेतले असून,  जुन्या वादातून त्यांनी ही हत्या केली असल्याचे समोर येत आहे.

योगेश रवि शर्मा (वय 16 वर्ष) असे मृत अल्पवयीन तरुणाचे नाव आहे. मिळालेली माहिती अशी की, योगेश शर्मा हा काल्हेर येथील आशापुरा कॉम्प्लेक्स भागात राहत होता. दरम्यान, 25 नोव्हेंबर रोजी सायंकाळी त्याच्या काही मित्रांनी त्याला काल्हेरच्या रेतीबंदर येथे दारू पिण्यासाठी येत असल्याचे सांगितले. त्यामुळे चकन्यासाठी काहीतरी घेऊन ये असे देखील त्याला सांगितले. त्यानंतर योगेश घरातून गेला तो परत आलाच नाही. त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी अनेक ठिकाणी शोध घेऊन देखील तो मिळून आला नाही. शेवटी नारपोली पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. योगेश अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता.

नारपोली पोलिसांनी योगेश यापूर्वी राहत असलेल्या कामतघर ब्रह्मानंदनगर येथील जुन्या मित्रांचा शोध घेतला. याचवेळी, काही युवकांसोबत सहा महिन्यापूर्वी योगेशचा वाद झाल्याचे पोलीस तपासात समोर आले. दरम्यान, याचवेळी पूर्ववैमनस्यातून आपल्या मुलाचे अपहरण झाले असल्याचा संशय योगेशच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला होता. त्यानंतर पोलिसांनी ब्रह्मानंदनगरच्या कामतघर परिसरातून आयुश विरेंद्र झा (वय19 वर्ष), मनोज नारायण टोपे (वय 19 वर्ष) या दोघांना ताब्यात घेऊन चौकशी केली. ज्यात, या दोघांनी योगेशची धारदार हत्याराने वार करून आणि डोक्यात दगड मारून निर्घृण हत्या केल्याचं स्पष्ट झाले. तसेच मृतदेह काल्हेर रेतीबंदर येथील निर्जन गवताच्या ठिकाणी पुरून ठेवल्याचे देखील सांगितले. नारपोली पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून, मृतदेह बाहेर काढत उत्तरीय तपासणीसाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे. तसेच, या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यात चार जणांचा समावेश असल्याचे समोर आले आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.  

Web Title: Murder Case took chakra for his friends and did not return, buried the body

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here