प्रेमाच्या जाळ्यात ओढून महिलेनेच पतीच्या मदतीने आवळला गळा
Raigad Crime: प्रेमाच्या जाळ्यात ओढून संपत्ती लुटण्याच्या बहाण्याने महिलेनेच पतीच्या सहाय्याने खैरे यांचा गुंगीचे औषध देऊन गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न.
रायगड: श्रीवर्धन शहराला लागूनच असलेल्या आराठी ग्रामपंचायत हद्दीतील कुंदन रेसिडेन्सी या इमारतीमध्ये युनियन बँकेमधील सेवानिवृत्त कर्मचारी रामदास गोविंद खैरे (वय 72) यांच्या हत्या प्रकरणाचा उलगडा लावण्यात श्रीवर्धन पोलिसांना यश आले आहे. प्रेमाच्या जाळ्यात ओढून संपत्ती लुटण्याच्या बहाण्याने महिलेनेच पतीच्या सहाय्याने खैरे यांचा गुंगीचे औषध देऊन गळा आवळून खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी महिला आणि तिच्या पतीला अटक करण्यात आली आहे.
एखाद्या चित्रपटातील पटकथेला शोभेल अशी ही घटना घडली आहे. रामचंद्र खैरे हे बँकेमध्ये नोकरीस होते. त्यांची पहिली पत्नी मयत झाल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता. दुसरी पत्नी 2021 साली कोविडमध्ये मयत झाली. मुलाचे लग्न झाल्यामुळे निवृत्ती काळात ते एकटेच एकाकी श्रीवर्धन येथे राहत होते. त्यांनी एक मित्राच्या मध्यस्थीने एक कविता नावाचे महिलेशी विवाह करण्याचे ठरविले. परंतु तिने मुंबईत प्लॅट घेऊन दागिने द्यावेत अशी मागणी खैरे यांच्याकडे केली. पण ती मागणी पूणर्र करू शकत नसल्याने तिने खैरे यांच्याशी विवाह केला नाही. काही दिवसांनी कविताने तिच्या चिंगी नावाच्या एका मैत्रिणीला खैरे यांचा मोबाईल नंबर दिला व संपर्क साधण्यास सांगितले.
त्यानुसार या महिलेने खैरे यांना फक्त लुबाडण्याच्या उद्देशाने लगट करून विवाह करण्याचे आमिष दाखिवले आणि त्यांच्यासमवेत बरोबर राहु लागली. खैरे यांचा विश्वास संपादन करून दागिने व काही पैसे घेवुन पसार झाली. त्यामुळे खैरे यांनी या महिलेकडे सोबत रहात नसल्याने दिलेले पैसे, दागिने परत देण्याची मागणी करु लागले. याच दरम्यान जून 2024 मध्ये या महिलेने पुण्यातील हर्षल कचर अंकुश याच्यासमवेत विवाद केला. तिने आपला पती हर्षल यास खैरे हे आपल्याला ब्लॅकमेल करीत असल्याचे सांगीतले. त्यावरुन दोघांनी खैरे यांना संपविण्याचा कट रचला.
त्याप्रमाणे 11 नोव्हेंबरपासून ही महिला पुन्हा खैरे यांच्याकडे राहण्यास गेली. त्यावेळी तिचा पती हर्षल हा देखील श्रीवर्धनला तिला सोडायला आला होता. त्यानंतर तो परत मुंबईला गेला. त्यानंतर तो काही दिवस हॉटेलवर येऊन राहिला. याच दरम्यान दोघांनी खैरे यांना ठार मारण्याचा कट रचला. याच दरम्यान हर्षल हा श्रीवर्धनमध्ये राहण्यास आला. त्यानुसार दि. 29 नोव्हेंबरला महिलेने खैरे यांना गुंगीचे औषध दिले. ते प्राशन केल्याने खैरे हे बेशुद्ध पडले. याचा फायदा घेत महिलेने पती हर्षलला घरात घेतले. त्यानंतर दोघांनी प्रथम डोक्यावर, कपाळावर तीष्ण हत्याराने मारून गंभीर जखमी केले. त्यानंतर पूर्ण मेल्याची खात्री होईपर्यंत उशीने तोंड व नाक दाबले. त्यानंतर तो मयत झाल्याची खात्री झाल्यानंतर घरातील साफसफाई करून मयताचे मोबाईल, दागिने काही पैसे घेवुन घराला बाहेरून बंद करून पहाटेच पसार झाले.
Web Title: Murder Dragging her into the web of love, the woman
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study