संतापजनक : प्रेमात प्रेयसीचा खून, ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवले, तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी
Murder Case: लिव्ह-इन- पार्टनर श्रद्धाचा गळा दाबून खून.
मुंबई : एक २६ वर्षांची मुलगी मुलाला भेटते, प्रेमात पडते आणि नंतर तिच्या पालकांच्या इच्छेविरुद्ध त्याच्यासोबत जाण्याचा निर्णय घेते. सगळे काही बॉलिवूड चित्रपटातील कथेप्रमाणे घडते; परंतु असेच केलेल्या मुलीच्या बाबतीत घडलेला प्रकार अंगावर शहारे आणणारा आहे. प्रियकर लिव्ह-इन पार्टनर मुलीची काही दिवसांनी हत्या करतो. तिच्या शरीराचे ३५ तुकडे करून फ्रीजमध्ये ठेवतो आणि त्याची विल्हेवाट लावण्यासाठी दिल्ली आणि परिसरात १८ रात्री फिरत राहतो… कुणालाही संताप येईल असा हा प्रकार आहे.
खून झालेल्या मुलीचे नाव श्रद्धा वालकर असे आहे. ती वसईच्या माणिकपूर परिसरात राहत होती. आफताब ने १८ मे रोजी लिव्ह-इन- पार्टनर श्रद्धाचा गळा दाबून खून केला होता. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले आणि ठेवण्यासाठी फ्रीज विकत घेतला. पुढील १८ दिवसांमध्ये दिल्लीच्या आसपासच्या विविध ठिकाणी तुकड्यांची विल्हेवाट लावण्यासाठी तो पहाटे २ वाजता घर सोडायचा, असा प्रकार पोलीस तपासात पुढे आला आहे. पोलिसांनी सांगितले की, आफताबने रागाच्या भरात मे २०२२ मध्ये तिची हत्या केली. त्याला अटक करण्यात आली आहे.
पीडिता मुंबईतील एका कॉल सेंटरमध्ये काम करत होती, जिथे तिची आफताबशी भेट झाली. त्यांनी डेटिंग करण्यास सुरुवात केली आणि नंतर ते एकत्र आले. कुटुंबाला त्यांचे नाते मान्य नव्हते म्हणून ते दिल्लीला गेले आणि मेहरौलीतील एका फ्लॅटमध्ये एकत्र राहत होते.
Web Title: Murder girlfriend in love, cut into 35 pieces and kept in the fridge
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App