Home अहमदनगर अहिल्यानगर: सोन्यासाठी नातवाने दाबला आजीचा गळा दाबून खून

अहिल्यानगर: सोन्यासाठी नातवाने दाबला आजीचा गळा दाबून खून

Breaking News | Ahilyanagar Murder Case: आजीच्या अंगावरील सोने काढून घेण्यासाठी नातवाने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना.

Murder Granddaughter strangles grandmother for gold

अहिल्यानगर : आजीच्या अंगावरील सोने काढून घेण्यासाठी नातवाने तिचा गळा दाबून खून केल्याची घटना नगर तालुक्यातील अकोळनेर शिवारात घडली. गोदाबाई लक्ष्मण जाधव (वय 90 रा. अकोळनेर) असे खून झालेल्या आजीचे नाव आहे. त्यांचा मुलगा पोपट लक्ष्मण जाधव (वय 55) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नीलेश बाळासाहेब जाधव (रा. अकोळनेर) असे खून करणार्‍या संशयित आरोपीचे नाव आहे.

दरम्यान, घटना घडल्यानंतर नगर तालुका पोलिसांनी नीलेश जाधव याला ताब्यात घेत अटक केली. त्याला सोमवारी (21 ऑक्टोबर) न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. फिर्यादी पोपट जाधव यांच्याकडे त्यांच्या आई गोदाबाई राहत होत्या. शनिवारी (19 ऑक्टोबर) सकाळी सव्वा आठच्या सुमारास नीलेश तेथे आला व त्याने गोदाबाई यांना सोबत नेले. त्यांच्या कानातील सोन्याची फुले, गळ्यातील माळ असा ऐवज काढून घेत असताना गोदाबाईने विरोध केला. त्यावेळी नीलेशने त्यांचा गळा दाबून खून केला. त्यानंतर कानातील सोन्याची फुले, गळ्यातील माळ असा 70 हजाराचा ऐवज काढून घेतला.

दरम्यान, गोदाबाईचा खून झाल्याचे दुसर्‍या दिवशी रविवारी (20 ऑक्टोबर) सकाळी साडेआठ वाजता उघडकीस आले. नगर तालुका पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर नगर ग्रामीणचे पोलीस उपअधीक्षक संपतराव भोसले, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद गिते, पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. खुनी निलेशला ताब्यात घेत अटक केली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गिते करत आहेत.

Web Title: Murder Granddaughter strangles grandmother for gold

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here