Home Ahmednagar Live News अहमदनगर ब्रेकिंग: प्रेमविवाह अन नंतर चारित्र्याच्या संशयावरुन १९ वर्षीय पत्नीचा खून

अहमदनगर ब्रेकिंग: प्रेमविवाह अन नंतर चारित्र्याच्या संशयावरुन १९ वर्षीय पत्नीचा खून

Ahmednagar News: प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या 19 वर्षीय पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या पोटात चाकू खूपसून खून (Murder) केल्याची खळबळजनक घटना.

Murder of 19-year-old wife due to character suspicion after love marriage

राहाता:  काही महिन्यापूर्वीच प्रेमविवाह केलेल्या पतीने आपल्या 19 वर्षीय पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेऊन तिच्या पोटात चाकू खूपसून खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी पतीने विष प्राशन केले असून त्यास लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे. महिला दिनी  ही खळबळजनक घटना साकुरी गावात घडली.

याप्रकरणी मयत मुलीचे वडील सुखदेव बाळासाहेब नागरे (वय 45) रा. साकुरी (डांगे वस्ती) यांनी राहाता पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. त्यात म्हटले आहे, माझी मुलगी सविता व पिंपळस येथील मुलगा सनी उर्फ सुनील शिवाजी ससाणे यांचे प्रेमसंबंध होते. त्यामुळे मी त्यांचा आंतरजातीय विवाह वर्षापूर्वी लावून दिला होता. मुलगी व जावई दोघेही साकुरी शिवारातच बरबंट यांच्या वस्तीवर मोलमजुरी करून त्यांची उपजीविका करत होते.

परंतु लग्नानंतर तीन महिन्यातच मुलगी सविता हिला तिचा पती सुनील संशयावरून सारखी मारहाण करत असे. नेहमी कोणाशी तरी फोनवर बोलते असे म्हणत संशय व्यक्त करून नेहमीच मारहाण, दमदाटी करायचा. ही बाब मुलीने वडील सुखदेव नागरे यांना सांगितली होती. त्यानंतर नागरे यांनी जावई सनी उर्फ सुनील ससाणे यास मुलीवर संशय घेऊ नकोस तिला मारहाण करून दमदाटी करू नकोस, असे वारंवार सांगितले मात्र सुनील याच्या वर्तनात कुठलाही बदल झाला नाही.

दि. 8 मार्च रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास घरातील आम्ही सर्व शेजारी लग्नाची वरात असल्याने पाहण्यासाठी गेले होतो. तेथे मुलगी सविता व तिचा पती सुनील हे देखील आले होते. लग्नाची वरात संपल्यानंतर रात्री अकरा वाजेच्या सुमारास आम्ही सर्व तिथून आमच्या घरी गेलो. मुलगी व जावई हे त्यांच्या घरी निघून गेले. त्यानंतर 9 मार्च रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास मुलगी सविता व तिचा पती सुनील खूप वेळ झाला तरी घराच्या बाहेर दिसले नाही म्हणून त्यांच्या कोपीकडे त्यांना बघण्यासाठी दुसर्‍या मुलीला पाठवले असता तेथे मुलगी सविता जमिनीवर पडलेली दिसली.

तिचे पोटावर रक्त साकळलेले व तिचे उजव्या हाताजवळ छोटासा चाकू दिसून आला. सविता तेथे मृत अवस्थेत तर सुनील दाजी यांचे हातात चाकू दिसला व ते मला पाहून कोपीचे बाहेर पळाले. असे मयताचे बहिण सरला हिने सांगितले. त्यामुळे तिने तेथे घाबरून मोठमोठ्याने आरडाओरडा केला. तेव्हा आम्ही त्या ठिकाणी पळत गेलो. तेथे बघितले असता माझी मुलगी सविता ही मृत अवस्थेत आढळून आल्याचे वडिलांनी फिर्यादीत म्हटले आहे.

सदरची घटना 8 मार्च रात्री 11 ते 9 मार्च रोजी सकाळी 10 वाजेच्या दरम्यान घडली आहे. माझी मुलगी सविता हिचे चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पोटात चाकू मारून तिचा खून केल्याची फिर्याद वडील सुखदेव नागरे यांनी पोलिसात दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती बघितली असता कोपीपासून काही अंतरावर आरोपी पती बेशुद्धावस्थेत आढळून आला. पोलिसांनी तातडीने त्याला लोणी येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या रुग्णालयात दाखल केले. त्याने विषारी औषध घेतले असल्याचे प्राथमिक तपासात दिसून आले.

आंतरजातीय विवाह केल्यानंतर वर्षे उलटले नाही तोच तीन महिन्यातच चारित्र्यावर संशय घेऊन पतीने 19 वर्षीय पत्नीच्या पोटात चाकू खुपसून खून केल्याच्या घटनेने साकुरीसह राहाता परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनील गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष पगारे हे करीत आहेत.

Web Title: Murder of 19-year-old wife due to character suspicion after love marriage

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here