Home Crime News Nagpur Crime : मात्र 2000 रुपयांच्या उधारीवरुन मित्राचा खूण ?

Nagpur Crime : मात्र 2000 रुपयांच्या उधारीवरुन मित्राचा खूण ?

Nagpur Crime
नागपूर : मित्रानेच मित्राची हत्या केल्याची धक्कादायक घटना नागपुरातून (Nagpur Crime) समोर आली आहे. नागपुरातील दिघोरी घाट (Dighori Ghat) परिसरात ही हृदय हेलावून टाकणारी घटना घडली आहे. दोन मित्रांमध्ये झालेल्या वादावादीनंतर एका मित्राने दुसऱ्या मित्रावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. या हल्ल्यात 19 वर्षीय रोशन पुरी (Roshan Puri) याचा जागीच मृत्यू झाला आहे. या घनटेने नागपुरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, रोशन पुरी आणि त्याचा मित्र अनमोल सुखराम मेश्राम यांच्यात बाचाबाची झाली होता. रात्री 9 च्या सुमारास दोघेही मद्यपान करीत असतानाच दोघांत वाद निर्माण झाला. या वादाचा विपर्यास हाणामारीत झालं. अनमोल मेश्राम याने आपला मित्र रोशन पुरी याच्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. या प्रकरणी वाठोडा पोलिसांनी एका मित्राला बेड्या ठोकल्या आहेत. तर अनमोलचा साथीदार मित्र फरार आहे.

प्राप्त माहितीनुसार अनमोल हा कार वॉशिंग सेंटरमध्ये तर रोशन कॅटरिंग सर्व्हिस सेंटरमध्ये काम करत होता. दोघेही अनेकदा एकाच ठिकाणी ऑर्डरवर जात असत. मात्र दोन वर्षांपूर्वी अनमोलने रोशनकडून 2000 रुपये उधार घेतले होते. दोन वर्षांनंतरही अनमोल याने उधार घेतलेले पैसे परत केले नव्हते. यामुळे रोशन त्याच्याकडून वारंवार पैसे मागत होता. यावरुन दोघांत अनेकदा वादही झाला होता. सोमवारी रात्रीच्या सुमारास अनमोल त्याचा आणखी एक मित्र चेतनला घेऊन रोशनला भेटला. दिघोरी घाटाजवळ असलेल्या योगेश्वरनगर येथे ते रोशनला घेऊन गेले.

यानंतर त्यांनी धारदार शस्त्राने रोशनवर सपासप वार केले. या हल्ल्यात रोशनचा मृत्यू झाला. स्थानिक नागरिकांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पोलिसांनी आपल्या तपासाची सूत्रे हलवली आणि दोन आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तर अद्यापही एक आरोपी फरार आहे. या फरार आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी एक टीम बनवली आहे.

Web Title : Murder of a friend on a loan of Rs. 2000

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here