Murder: ट्रॅक्टर ट्रोली लावण्याच्या वादातून एकाचा खून
Ahmednagar | karjat | कर्जत: कर्जत तालुक्यातील नागलवाडी येथे मंगळवारी व बुधवारी किरकोळ वादातून मारहाण झालेल्या लालचंद सोलंकी यांचा सोमवारी मृत्यू झाला. याप्रकरणी दोघांविरोधात खुनाचा (Murder) गुन्हा दाखल झाला असून दोघांना अटक केली आहे. ट्रॅक्टर ट्रोली लावण्याच्या किरकोळ वादातून ही घटना घडली.
लालचंद सोळंकी यांचे बांधी विजयकुमार सोळंकी यांच्या फिर्यादीवरून विजय रामदास माने आणि पांडुरंग मच्छिंद्र माने रा. नागलवाडी ता. कर्जत याच्याविरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
नागलवाडी येथे मंगळवारी विजय रामदास माने यांनी विजयकुमार सोळंकी यांच्या घरासमोर ट्रोली लावली. त्यावेळी त्यांची पत्नी सुनीता हिने घरासमोरील पाईप फुटेल, आमची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. येथे ट्रॅक्टर ट्रोली लावू नका अशी विनंती केली. त्यानंतर विजय माने आणि पांडुरंग माने यांनी विजयकुमार सोळंकी व त्याची पत्नी सुनीता आणि भाऊ लालचंद यास मारहाण केली. त्याननंतर दुसऱ्या दिवशी बुधवारी लालचंद सोळंकी यांनी विजय माने यांना तू मला का मारहाण केली. असे विचारले असता त्यांनी त्यांना पुन्हा मारहाण केली. शनिवारी लालचंद यांच्या बरगड्या दुकू लागल्याने सुरुवातीला गावात नंतर नगर येथे हलविण्यात आले. उपचार घेऊन पुन्हा घरी आले. मात्र १४ मार्च पुन्हा अस्थवस्थ वाटू लागले. नगर येथे उपचारास नेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
Web Title: Murder of a man in a tractor trolley dispute