Home Maharashtra News दिर पडला वाहिनीच्या प्रेमात अन केले हे भयानक कृत्य

दिर पडला वाहिनीच्या प्रेमात अन केले हे भयानक कृत्य

Murder of a pregnant Vahini who fell in love with Vahini 

मुंबई | Mumbai: कुर्ला परिसरातून धककादायक घटना समोर आली आहे. वहिनीच्या प्रेमात पडलेल्या दिराने गरोदर असलेल्या वहिनीची हत्या (Murder) केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिलेसह तिच्या पोटातील बाळाचाही मृत्यू झाला आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून २४ तासांच्या आतच दिराला अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.

संजय सोनकर हा त्याची पत्नी कोमलसोबत राहात होता. संजय आणि त्याचा चुलत भाऊ अर्जुन दोघेही चहाच्या दुकानामध्ये काम करायचे आणि तिघेही एकत्र राहत होते. दरम्यान, अर्जुन हा आपल्याच चुलत भावाच्या पत्नीच्या प्रेमात पडला होता. कोमल सात महिन्यांची गर्भवती होती. बुधवारी अर्जुन दुपारी संजयच्या घरी आला. काही वेळानं निघूनही गेला. अर्जुन निघून गेल्यानंतर कोमल घरातून बाहेरच आलेली नव्हती. शेजारच्या महिलांनी कोमला आवाज दिला. पण काहीच प्रतिसाद न आल्यानं शेजारचे घरात गेले, तेव्हा कोमल जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेली. तिच्या तोंडातून रक्त येत असल्याचे पाहून घाबरले. पोलिस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर त्यांनी मृतदेह (Dead body) ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी पाठवला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोमल तिच्या गावाला बाळंतपणासाठी माहेरी जाणार होती. पण कोमलच्या प्रेमात पडलेला दिर अर्जुनला तिला जाऊ द्यायचे नव्हते. बुधवारी अर्जुन कोमलच्या घरी आला. घरी जाऊ न देण्यावरुन त्यांच्यात वाद झाले. त्यानंतर अर्जुनने गळा दाबून कोमलचा खून (Murder) केला. यात तिच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचाही मृत्यू (Death)झा ला. आरोपी अर्जुनला २४  तासांच्या आत ताब्यात घेतले आहे. याबाबत पुढील तपास सुरू आहे.

Web Title: Murder of a pregnant Vahini who fell in love with Vahini 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here