राजूर | Rajur: अकोले तालुक्यातील पांभुळवंडी येथील एका तरुणाचा रस्त्यात अडवून खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पांभुळवंडी येथील योगेश भास्कर भालेराव (वय 27)हा शेंडीला जात असताना त्याला रस्त्यात आडवुन दोघानी देवगाव शिवारात मारुन टाकल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
आदिवासी भागातील पाभुळवंडी येथे दि.4 एप्रिल रोजी सायकाळी रमेश जाधव व त्याच्या नातेवाईकासमवेत भांडणे झाली असुन त्याला मारल्याचे सागितले. तर रमेश जाधव हा घरासमोर येऊन पुन्हा योगेश बाहेर ये तुला दाखवतो. तुझा मुडदा पाडतो असे म्हणुन वाईट-साईट शिविगाळ करुन निघुन गेला.
तर दि.5 एप्रिल रोजी सकाळी घरातून पिवळ्या रंगाची स्कुटी घेऊन योगेश भालेराव हा शेंडीला कामानिमित्त गेला होता. तर काही वेळेने निरोप घेऊन असता तुमचा मुलगा देवगावच्या झाडाखाली पडल्याची माहिती भांगरे यांनी दिली.
तर योगेश भास्कर भालेराव (वय 27) हा शेंडीला जात असताना त्याला रस्त्यात अडवुन रमेश दत्तु जाधव व मधुकर दत्तु जाधव यांनी देवगाव शिवारात मारुन टाकल्याची फिर्याद राजूर पोलिस स्टेशनला मयत मुलाचे वडील भास्कर संतु भालेराव यांनी दिल्यावरुन राजूर पोलिसांत भा.द.वि.कलम 302,34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास राजूर पोलीस करीत आहे.
Web Title: Murder of a youth by blocking the road in Akole taluka