Home पाथर्डी अहमदनगर: धारदार शास्त्राने वार करीत युवकाचा खून

अहमदनगर: धारदार शास्त्राने वार करीत युवकाचा खून

Breaking News | Ahmednagar: धारदार शास्त्राने एका युवकावर घरसमोरच वार करून हत्या केल्याची घटना हल्लेखोर अज्ञात, कारण गुलदस्त्यात.

Murder of a youth by stabbing him with a sharp knife

पाथर्डी: धारदार शास्त्राने एका युवकावर घरसमोरच वार करून हत्या केल्याची घटना शनिवारी (ता.४) सकाळी पाथर्डी तालुक्यातील मांडवे शिवारात घडली आहे.

अविनाश बाळू जाधव (वय २७) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. शनिवारी (ता.४) सकाळी घटनेची माहिती पोलिसांना मिळताच शेवगाव उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, पोलिस निरीक्षक संतोष मुटकुळे, सहाय्यक पोलिस निरीक्षक जगदीश मुलगिर, नितीन रणदिवे, पोलिस उपनिरिक्षक सचिन लिंमकर, निवृत्ती आगरकर, गुप्तवार्ता विभागाचे भगवान सानप आदींनी घटनास्थळी धाव घेतली.

तालुक्यातील मांडवे शिवारात जाधव वस्तीवर ही हत्या झाली असून अविनाश यांच्या डोक्याच्या मागे, मानेवर आणि छातीवर धारदार शस्त्रानेअनेक ठिकाणी वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. अविनाश जाधव याचा मृतदेह घरासमोर रक्ताच्या थारोळ्यात पोलिसांना आढळून आला. नेमकी अविनाश याची हत्या कोणी केली ? का केली? याचा शोध पोलिस करीत असून घटनास्थळी फॉरेन्सिक व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले होते. शुक्रवारी रात्रीच्या वेळी अविनाश जाधव हा घरी असताना अज्ञात व्यक्तीने अविनाश याची हत्या केली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा संपूर्ण परिसराची पाहणी केली असून काही संशयस्पद वस्तू पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. आरोपींच्या शोध घेण्यासाठी पोलिसांची टीम तपासाचे काम करीत आहे. पोलीस हवालदार आजिनाथ बडे, नितीन दराडे, राम सोनवणे, ईश्वर बेरड, विनोद मासळकर, देविदास तांदळे, अल्ताफ शेख आदी पोलिस कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Murder of a youth by stabbing him with a sharp knife

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here