महावितरणमधील अधिकाऱ्याचा भरदिवसा खून, अनैतिक संबंधांची किनार
Pune Crime: अनैतिक संबंधाचा वादातून महावितरणमधील एका वरिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून (Murder) केल्याची धक्कादायक घटना.
पुणेः अनैतिक संबंधाचा वादातून महावितरणमधील एका वरिष्ठ तंत्रज्ञ कर्मचाऱ्याचा तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याची धक्कादायक घटना पुण्यातील सिंहगड रोड भागातील रायकर मळा परिसरात सोमवारी दुपारी मनोहर गार्डनजवळ खंडोबा मंदीर रोड परिसरात घडली आहे. गोपाळ कैलास मंडळे (वय ३२, रा. ओवी अंगण कॉलनी, जाधवनगर, रायकर मळा) असं खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सिद्धांत दिलीप मांडवकर या संशियीत आरोपीला ताब्यात घेतले आहे. याबाबत रात्री उशिरापर्यंत सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. हा खून अनैतिक संबंधाचा संशय आणि याआधी झालेल्या वादातून करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महावितरणमध्ये गोपाळ मंडळे हे वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून नोकरीस होते. त्यांची महावितरणच्या सिंहगड रोड विभागात नेमणूक होती. मागील चार वर्षांपासून मंडळे हे रायकर मळा येथे पत्नी, मुलगा, आई यांच्यासोबत वास्तव्यास होते. मांडवकर याचे नात्यातल्या एका महिलेसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मंडळे यांना होता. त्यातून दोघांचा वाद झाला होता. तो वाद मिटवण्यासाठी दोघे एकत्र खंडोबा मंदिर रोड परसिरात आले असताना, परत त्यांच्यात वाद झाला. त्यावेळी मांडवकर याने चाकूने मंडळे यांच्या गळ्यावर वार केले.
गंभीर जखमी झाल्याने मंडळे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मांडवकर फरार झाला होता. ही घटना भरदिवसा रस्त्यावर घडली. तेथून जाणार्या एका व्यक्तीने पोलिसांना ही माहिती दिली होती. त्यानुसार सिंहगड रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन, जयंत राजुरकर यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी मंडळे हे रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसून आले. मंडळे यांचा खून केल्यानंतर मांडवकर हा तेथून पसार झाला.
दरम्यान, स्थानिक पोलिसांबरोबर गुन्हे शाखेची पथके देखील त्याचा शोध घेत होती. त्यावेळी दरोडा व वाहनचोरी विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक इंदलकर यांना मांडवकर हा धायरी परिसरात असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पथकाने त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता मांडवकर याने खुनाची कबुली दिली.
Web Title: Murder of an officer in Mahavitaran in broad daylight, edge of immoral relations
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App