Home पुणे प्रियकराकडून प्रेयसीच्या मुलाचा खून

प्रियकराकडून प्रेयसीच्या मुलाचा खून

Breaking News | Pune Crime:  प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाने उलटी केल्याने प्रियकराने त्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यात या चिमुरड्याचा मृत्यू.

Murder of girlfriend's son by boyfriend

पुणे : प्रेयसीच्या चार वर्षांच्या मुलाने उलटी केल्याने प्रियकराने त्या मुलाला बेदम मारहाण केली. त्यात या चिमुरड्याचा मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्यानंतर आरोपी प्रियकराला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली. महेश कुंभार (रा. पंचवटी, नाशिक) असे आरोपीचे नाव आहे. वेदांश वीरभद्र काळे (४, रा. बिबवेवाडी) असे मारहाणीत मृत्यूमुखी पडलेल्या मुलाचे

नाव आहे. वेदांश खाटेवरून खाली पडल्याने बेशुद्ध पडल्याचा बनाव करून त्याची आई पल्लवीने त्याला मंगळवार पेठेतील कमला नेहरू रुग्णालयात दाखल केले होते. सोमवारी त्याचा मृत्यू झाला. शवविच्छेदन अहवालात वेदांशचा मृत्यू बेदम मारहाणीमुळे झाल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले होते. बिबवेवाडी पोलिसांनी वेदाशंची आई पल्लवीकडे चौकशी केली. चौकशीत पल्लवी तीन

महिन्यांपासून बिबवेवाडीत राहत होती. तिचे नाशिकमधील महेश कुंभार याच्याशी प्रेमसंबंध असल्याचे उघडकीस आले. पल्लवी मुलाला घेऊन आरोपी महेशच्या घरी गेली होती. १ सप्टेंबर रोजी रात्री जेवण केल्यानंतर वेदांशने उलटी केल्याने महेश चिडला. त्याने वेदांशला झाडूने मारहाण केली. वेदांश बेशुद्ध पडल्यानंतर त्याला नाशिकमधील सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Web Title: Murder of girlfriend’s son by boyfriend

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here