Home श्रीरामपूर अहमदनगर ब्रेकिंग!  हॉटेल चालकाचा खून

अहमदनगर ब्रेकिंग!  हॉटेल चालकाचा खून

Breaking News | Ahmednagar: चहा-वडापावचे हॉटेल बंद करून रात्री तिथेच झोपल्यावर हत्या; अज्ञात व्यक्तीवर गुन्हा दाखल.

Murder of hotel operator

श्रीरामपूर | पाचेगाव: पहाटे झोपेत असताना एका हॉटेल चालकाचा डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करत निर्घृण खून करण्यात आल्याची घटना श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉलजवळ बेलपिंपळगाव शिवारात बुधवारी पहाटे घडली.

याबाबत माहिती अशी की, बाळासाहेब सखाहरी तुवर (वय ६०) रा. कारवाडी (पाचेगाव) ता. नेवासा असे खून झालेल्या हॉटेल चालकाचे नाव आहे. श्रीरामपूर नेवासा मार्गावरील लोखंडी फॉल नजीक ओम साई नावाने ते हॉटेल चालवीत होते. बुधवारी (दि.१३ मार्च) पहाटेच्या सुमारास झोपेत असताना त्यांच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आल्याचे प्राथमिक माहितीत समोर आले आहे. नेवासापोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना घटनेची माहिती कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाकडून घटनेचा तपास सुरू असून दुपारी न्यायवैद्यक पथकही दाखल झाले होते.

याबाबत मयताचा पुतण्या विष्णू गंगाधर तुबर (वय ३७) रा. पाचेगाव यांनी नेवासा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत म्हटले की, आमच्या गावामध्ये माझे चुलते बाळासाहेब सकाहरी तुवर हे कुटुंबासह राहावयास असून त्यांनी बेलपिंपळगाव शिवारात लोखंडी फॉल येथे नानासाहेब संत यांचे चहा व वडापावचे हॉटेल ८ महिन्यापासून भाड्याने चालवायला घेतले असून चुलते हॉटेल चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. चुलते तसेच चुलती यशोदा असे दोघेजण दिवसभर हॉटेल चालवून चुलती यशोदा हिस जवळच असलेल्या कारबाडी (पाचेगाव) येथील राहते घरी रात्री ९ वाजेच्या सुमारास सोडवून पुन्हा त्यांचे हॉटेल ओमसाई येथे रात्री दहा वाजता हॉटेल बंद करून तेथेच ते एकटे झोपत होते.

१३ मार्च रोजी सकाळी ८-३० वाजेच्या सुमारास मला माझे नातेवाईक दादा बाबुराव पवार, रा. कारवाडी यांचा फोन आला व त्यांनी मला फोनवर सांगितले की, तुमचे चुलते बाळासाहेब हे हॉटेलमध्ये जखमी अवस्थेत पडलेले आहे. मी, माझा भाऊ शंकर गंगाधर तुबर, दाजी राजेंद्र गंगाधर पवार असे आम्ही गेलो असता ते हॉटेलमध्ये रक्ताच्या थारोळ्यात अंथरुणावर पडलेले आम्हाला दिसले. त्यांच्या डोक्याला जखम होऊन कानातून रक्त येऊन त्यातच ते मयत झाल्याचे दिसले. त्यानंतर नेवासा येथील पोलीस आले त्यांनी चुलते बाळासाहेब सखाहारी तुवर यांचा मृतदेह शवविच्छेदनाकरिता

ग्रामीण रुग्णालय नेवासा फाटा येथे घेऊन गेले. या फिर्यादीवरून नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नं. २५१/२०२४ भारतीय दंड विधान कलम ३०२ प्रमाणे अज्ञात व्यक्तींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान घटनास्थळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक, नेवासा पोलीस निरीक्षक धनंजय जाधव, उपनिरीक्षक विजय भोंबे, बिट हवालदार बबन तमनर, सुमित करंजकर, पोलीस नाईक आप्पासाहेब वैद्य, राहुल गायकवाड आदी ठाण मांडून होते. घटनास्थळी नगरहून न्यायवैद्यक तपासणी पथक बोलविण्यात आले होते.

Web Title: Murder of hotel operator

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here