Home अहमदनगर Murder: दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाचा खून

Murder: दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकाचा खून

Murder of one for not paying for alcohol

श्रीगोंदा | Murder: दारू पिण्यासाठी पैसे मागितले असता पैसे न दिल्याने याच रागातून झालेल्या वादात एका ७० वर्षीय वृद्ध व्यक्तीची हत्या झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास श्रोगोंदा शहरात ही घटना घडली.  

बापु विष्णु ओहळ, वय 70 वर्षे, मुळ रा. पिसोरेखांड, ता. श्रीगोंदा हल्ली रा. लिपणगाव, ता. श्रीगोंदा, असे या खून झालेल्या मयत व्यक्तीचे नाव आहे. तर सुनील तात्याराव ससाणे वय ४० रा घुगलवडगाव असे या मारहाणीत जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे

याप्रकरणी सुनील भागचंद घोडके यांच्या फिर्यादीवरून आरोपी नामदेव सुनील भोसले रा मांडवगण याच्या विरोधात श्रीगोंदा पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे,  पोलिसांनी रात्रीच शोध मोहीम राबवत आरोपीस  अटक केली आहे.

काल रात्री यातील आरोपीने मयत ओहळ यांच्याकडे दारू पिण्यासाठी पैसे मागितले त्यातून झालेल्या वादात आरोपीने मयत ओहोळ यांच्या नाका-तोंडावर हाताने ठोसे मारुन जखमी केले व गळ्याला कपड्याने आवळुन खुन करुन पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने त्यांना फरफटत नेऊन श्रीगोंदा नगर परीषदचे बंद गाळ्याचे बाजुला लेंडी नाल्याजवळ झुड़पामध्ये नेवुन टाकण्यात आले.  याप्रकरणी  अधिक तपास सहायक पो निरीक्षक दिलीप तेजनकर करत आहेत.

Web Title: Murder of one for not paying for alcohol

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here