Murder: सावत्र पित्याचा मुलीकडून खून
वानाडोंगरी जि. नागपूर | Murder: बळजबरी करणाऱ्या सावत्र वडील ज्ञानेश्वर दामाजी गडकर वय ६० याचा १५ वर्षीय मुलीने लाकडी दांड्याने तोंडावर वार करून खून केल्याची घटना हिंगणा तालुक्यातील सावळी बीबी येथे सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली.
ज्ञानेश्वरची पहिली पत्नी त्याला सोडून गेल्यानंतर त्याने १५ वर्षापूर्वी वंदना या महिलेशी विवाह केला होता. त्यावेळी वंदना सुद्धा विवाहित होती. तिला पहिल्या पतीपासून एक मुलगी होती. काही दिवस सावळी या गावात ज्ञानेश्वर व वंदना एकत्रित राहिल्यानंतर तो खापरी जि. वर्धा येथे राहायला गेला होता. अधूनमधून तो सावळी येथे वंदनाकडे यायचा. येथे आल्यांनंतर तो पत्नी वंदना व सावत्र मुलीला नेहमी त्रास द्यायचा. सोमवारीही सकाळी ११ वाजता सावळी येथे दारू पिऊन आला, सावत्र मुलीशी बळजबरी करून त्याने त्रास द्यायला सुरुवात केली. पत्नीला सुद्ध ऐकत नव्हता. मुलीला हा त्रास सहन झाला नाही म्हणून भांडण झाले. यात मुलीने लाकडी दांडा उचलून ज्ञानेश्वरच्या तोंडावर मारला. घाव बसताच तो घराच्या अंगणातच खाली पडून त्याचा मृत्यू झाला.
Web Title: Murder of stepfather’s daughter