Home महाराष्ट्र प्रेमभंगातून भररस्त्यात तरुणीची हत्या, प्रियकराने लोखंडी पान्याने हल्ला

प्रेमभंगातून भररस्त्यात तरुणीची हत्या, प्रियकराने लोखंडी पान्याने हल्ला

Breaking News | Crime:  प्रियकराचा दिवसा भररस्त्यात हल्ला, ती मृत झाल्यानंतरही अनेक वार केले.

Murder of wealthy young woman due to adultery

नालासोपारा:  प्रेम प्रकरणातून प्रियकराने भरदिवसा रस्त्यावर आपल्याच प्रेयसीची लोखंडी पान्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी सकाळी वसईत घडली.

आरती रामदुलार यादव (२२) ही गौराईपाड्याच्या वाढाण इंडस्ट्रीत कामावर जात होती. तेवढ्यात रोहित रामनिवास यादव (२९) याने लोखंडी पान्याने तिच्या डोक्यावर १५ ते १६ वार केले. ती रक्ताच्या थारोळ्यात पडली. यानंतरही आरोपी रोहित वार करीतच राहिला. तरुणीचा मृत्यू झाल्यानंतरही आरोपीने अनेक वार केल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

दोघांमध्ये ६ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. महिनाभरापासून तरुणीच्या वागण्याचा संशय येत असल्याने व ब्रेकअप झाल्याने प्रियकराने रागाच्या भरात हे निघृण कृत्य केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

दोघांमध्ये अनेक वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्या मुलीला दुसरा मुलगा भेटल्याच्या संशयातून व रागाच्या भरात आरोपीने ही हत्या केल्याची प्राथमिक माहिती आहे.

लोक बघ्याच्या भूमिकेत

एका तरुणाने रोहितला अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपीने त्याच्याकडे लोखंडी पाना रोखल्याने तो मागे हटल्याचे प्रत्यक्षदर्शिनी सांगितले.

हत्या केल्यानंतर आरोपी रोहित मृतदेहाजवळच बसून राहिला होता. मृतदेहाजवळ बसलेला असताना वालीव पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. हत्या होत असताना रस्त्यावरील अनेकांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली.

Web Title: Murder of wealthy young woman due to adultery

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here