मुलाची निर्घृण हत्या, कोयत्याने मृतदेहाचे तुकडे स्वयंपाकघरात दडविले
अल्पवयीन मुलाची हत्या (Murder) करत मृतदेहाचे तुकडे स्वयंपाकघरात ठेवल्याची धक्कादायक घटना.
मुंबई : पत्नी आणि मेहुणीची छेड काढतो या रागातून रिक्षाचालकाने एका अल्पवयीन मुलाची हत्या करत मृतदेहाचे तुकडे स्वयंपाकघरात ठेवल्याची धक्कादायक घटना चेंबूरमध्ये घडली. याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी शफिक अब्दुल मजीद शेख (३३) याला अटक केली. ईश्वर पुत्रण असे मृताचे नाव आहे.
चेंबूरच्या वाशी नाका परिसरातील म्हाडा कॉलनीत शेख कुटुंबीय राहण्यास आहे. ईश्वर हा पत्नी आणि मेहुणीची छेड काढत असल्याचा शेखला संशय होता. वस्तुत: ईश्वर हा त्याच्या पत्नीचा मानलेला भाऊ होता. आधीही शेखने पत्नी आणि मेहुणीची छेड काढत असल्याच्या रागात वेळोवेळी ईश्वरला समज दिली होती. सोमवारी सकाळी शेखने ईश्वरला घरी बोलावून पुन्हा समज दिली. मात्र, त्याने शेखलाच उलट उत्तरे दिली. याच रागात संतापलेल्या शेखने घरातील कोयत्याने ईश्वरच्या डोक्यावर वार करत त्याची हत्या केली. त्यानंतर मृतदेहाचे हात, पाय, डोके धडापासून वेगळे केले.
शेखच्या सासयाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. ईश्वरला आई-वडील नसल्याने तक्रारदारच त्याचा सांभाळ करत होते. २८ तारखेला त्यांनी शेखसोबत जाताना ईश्वरला शेवटचे पाहिले होते. त्यानंतर, त्याच्याशी संपर्क न झाल्याने त्यांनी शेखकडे चौकशी केली. मात्र, त्याने उत्तर दिले नाही. त्यांनीही पोलिसांकडे मदत मागितली. शेखच्या वागण्याने पत्नीने बुधवारी घरी येण्याचा आग्रह धरला. अखेर, त्याने पत्नीला घटनाक्रम सांगताच तिला धक्का बसला.
Web Title: murder the boy, The Coyote hid the body parts in the kitchen
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App