Breaking News | Sangamner: पूर्वीच्या वादातून खून झाल्याचे आले समोर.
संगमनेर : कोल्हार-घोटी राज्य मार्गावर समनापूर गावच्या शिवारात एका हॉटेलजवळील मैदानात २३ वर्षीय युवकाचा गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला होता. हा प्रकार शनिवारी (दि.२३) सकाळी ७:३० वाजेच्या सुमारास आढळून आला. पूर्वी झालेल्या वादातून तिघांनी त्याची गळा चिरून हत्या केली. युवकाच्या खूनप्रकरणी संगमनेर शहर पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
अब्दुल शोभाचंद सावंत (रा. मोतीनगर, समनापूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. किसन सरदार सावंत, सागर रमेश मुळेकर, राजेश मनोज मकवाने (सर्व रा. मोतीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत. त्यांच्याविरोधात मयताचा मोठा भाऊ सुनील शोभाचंद सावंत (वय ३२, रा. मोतीनगर, समनापूर, दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.
अब्दुल सावंत आणि किसन सावंत, सागर मुळेकर, राजेश मकवाने यांच्यात पूर्वी वाद झाले होते. झालेल्या वादाचा राग धरून त्या तिघांनी अब्दुल सावंत याच्यावर धारधार हत्याराने गळा चिरला, छातीवर, मानेवर, पोटावर वार करत त्याचा खून केला. पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला.
अनोळखी युवकाचा गळा कापलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याची माहिती समनापूरचे पोलिस पाटील गणेश शेरमाळे यांनी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दिली होती.
Web Title: murder was investigated
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study