Home महाराष्ट्र जेष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांचे निधन

जेष्ठ संगीतकार रामलक्ष्मण यांचे निधन

Musician Ramalakshman passes away

Musician Ramalakshman: प्रख्यात संगीतकार राम लक्ष्मण यांचे निधन नागपूर येथे काल रात्री १ वाजता झाले आहे. ते काही महिन्यापासून आजारी होते. अखेर ७९ वर्षी त्यांची रात्री प्राणज्योत मालवली आहे. शनिवारी दुपारी  १२ वाजता पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

राम लक्ष्मण यांचे खरे नाव विजय काशिनाथ पाटील. वयाच्या २० व्या वर्षी त्यांनी बॉलीवूड क्षेत्रात पदार्पण केले. त्यांच्या नावावर तब्बल ९२ चित्रपट आहेत. त्यांनी मराठीतच नाही तर हिंदी चित्रपटात देखील दमदार गाणी दिली आहेत.

पांडू हवालदार,  आली अंगावर, राम राम गंगाराम, पथ्थर के फुल,  मैने प्यार किया, हम आपके है कौन,  हम साथ साथ है. हमसे बढकर कौन आदी चित्रपटांना संगीत. त्यांनी दिले आहे.  राम कदम आणि विजय पाटील या जोडीने संगीत द्यायला सुरुवात केली नंतर राम 1977 ला गेले मग विजय यांनी रामलक्ष्मण नावाने संगीत द्यायला सुरुवात केली. 

Web Title: Musician Ramalakshman passes away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here