Home संगमनेर संगमनेर: नोटरी केलेल्या जागेची परस्पर विक्री

संगमनेर: नोटरी केलेल्या जागेची परस्पर विक्री

Breaking News | Sangamner: नोटरीवर केलेल्या जागेची परस्पर दुसऱ्याला विक्री करून येथील एकाला तालुक्यातील चिखली येथील एकाने फसविल्याची (Fraud) घटना नुकतीच उघडकीस.

Mutual sale of premises notarized

संगमनेर : नोटरीवर केलेल्या जागेची परस्पर दुसऱ्याला विक्री करून येथील एकाला तालुक्यातील चिखली येथील एकाने फसविल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. याप्रकरणी येथील पोलिसांनी फसवणूक करणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, संगमनेर येथील भारत रेघाटे यांनी २०१४ मध्ये संगमनेर तालुक्यातील चिखली गावातील भानुदास बाळकृष्ण

हासे याच्याकडून दोन गुंठे जमीन घेतली होती. खरेदीचा करारनामा केल्यानंतर जागा नावावर करून देतो, असे हासे याने सांगितले. यानंतर १ एप्रिल २०१४ रोजी नोटरी करून खरेदी करारनामा करून घेतला. नोटरी दरम्यान रेघाटे यांनी ७१ हजार रुपये रोख दिले. खरेदीची उर्वरित ७१ हजार रुपये रक्कम ही चेक आणि रोख स्वरूपात अशी १ लाख ४२ हजार भानुदास हासे याला दिली.

त्यानंतर नोटरी प्रमाणे खरेदी केलेली दोन गुंठे जमीन हासे याने रेघाटे यांच्या नावावर करून दिली नाही. खरेदी केलेल्या जागेला रस्ता नसून रस्ता करून देण्यासाठी २० हजार लागतील, असे हासे याने सांगितल्याने रेघाटे यांनी पुन्हा २० हजार रुपये रोख दिले. परंतु त्यानंतरही दोन गुंठे जागा खरेदी करून दिली नाही. नोटरी प्रमाणे खरेदी केलेल्या दोन गुंठे जागेवर पोल रोवले असता याने सदरचे काढून टाकले. याबाबत रेघाटे यांनी ग्रामपंचायत मध्ये जाऊन नोटरी प्रमाणे खरेदी केलेल्या जमिनीवर बांधकाम करण्याची परवानगी मागण्यासाठी अर्ज केला. परंतु नावावर जमीन झालेली

नसल्याने सदर परवानगी नाकारली. त्यानंतर वेळोवेळी मागणी करून देखील नोटरी प्रमाणे दोन गुंठे जागा नावावर झाली नाही. रेघाटे यांनी

चौकशी केली असता नोटरीवर व्यवहार केलेला दोन गुंठ्याचा प्लॉट हा हासे याने नातेवाईकाला विकला असल्याचे त्यांना समजले. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने रेघाटे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी शहर पोलिसांनी भानुदास बाळकृष्ण हासे याच्याविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: Mutual sale of premises notarized

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here