Home Maharashtra News ‘ललित-नीरव मोदी देश लुटून पळाल्याची चौकशी भाजप नेते करत नाहीत’ – नाना...

‘ललित-नीरव मोदी देश लुटून पळाल्याची चौकशी भाजप नेते करत नाहीत’ – नाना पाटोले

Nana Patole latest

मुंबई – ‘मी मोदीला मारु शकतो आणि शिव्याही देऊ शकतो’ असे खळबळजनक वक्तव्य काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्याने संपूर्ण राज्यात भाजप आंदोलन करीत आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचारात केलेल्या या वक्तव्याने खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपने आक्रमक भूमिका घेत नाना पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यानंतर नानांनी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत ते विधान गावगुंड मोदीबद्दलच होतं हे त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.

नाना पटोले यांचा खुलासा खोटा असल्याचा आरोप महाराष्ट्र भाजपाचे उपाध्यक्ष माधव भंडारी यांनी केला आहे. नाना पटोलेंनी त्या गावगुंडाचा फोटो आणि संपूर्ण माहिती प्रसिद्ध करावी, असे आव्हान भंडारी यांनी दिले आहे. त्यानंतर, नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधला. भाजप एखाद्या मुद्द्याला पकडून राजकारण करत असल्याचे ते म्हटले. तसेच, देशातून ललित मोदी, नीरव मोदी देश लुटून पळून गेले त्याची भाजप नेते चौकशी करत नाहीत असेही ते म्हणाले.

गावगुंड नेमका कोण आहे? याबाबत वाच्यता केली असता, पोलिसांचा तपास सुरू आहे. भंडारा पोलिसांनी मोदी नावाच्या गावगुंडाला पकडलं आहे. पोलीस चौकशी करत आहेत, असे नाना पटोलेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. काँग्रेसच्या जिल्हाप्रमुखांना भाजप नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यास सूचवले आहे. बिल्कुल त्यानं माझ्याविरोधात खूप प्रचार केला, मला पाडण्याचा प्रयत्न केला. त्या लोकांमुळे मला हे कळालं, त्या भाजप नेत्यांविरुद्ध, कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यास सांगितल आहे. दरम्यान, बाकी भंडारा पोलिसांना विचारा, असेही नानांनी यावेळी सांगितले.

Web Title : BJP leaders are not investigating Lalit Modi, Nirav Modi looting the country and fleeing – Nana Patole

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here