Home Maharashtra News नाना पाटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपची महाराष्ट्रभरात निदर्शने

नाना पाटोले यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपची महाराष्ट्रभरात निदर्शने

Nana Patole on Mo

कल्याण (संतोष दिवाडकर): काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटताना दिसून येत असून कल्याण (Kalyan) शहरातही भाजपतर्फे (BJP) जोरदार निदर्शने करण्यात आली. कल्याण पूर्वेतील आंदोलनात भाजपचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी नाना पाटोले यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत निषेध नोंदविण्यात आला.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा व्हायरल झालेला व्हिडिओ समोर आला. ज्यात त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजपकडून त्याविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. काही दिवसांपूर्वी पंजाबमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षे व्यवस्थेतील त्रुटीनंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्षाकडून करण्यात आलेले हे वक्तव्य संशयास्पद असल्याचे सांगत राज्य सरकारने त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी यावेळी भाजपतर्फे करण्यात आली. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर ज्याप्रमाणे कारवाई केली तशीच कारवाई करण्याची हिंमत आघाडी सरकारने दाखवावी अशी संतप्त मागणीही यावेळी कल्याण भाजप जिल्हाध्यक्ष यांनी केली.

(Nana Patole on Modi) कल्याण पूर्वेतील स्व. प्रल्हाद शिंदे उड्डाणपूलाखाली झालेल्या या निदर्शना नंतर कोळसेवाडी पोलिसांना आपल्या मागण्यांचे निवेदनही भाजपतर्फे देण्यात आले आहे.

Web Title : BJP protests across Maharashtra after Nana Patole’s controversial statement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here