खळबळजनक! नाशिकमध्ये प्रसादातून विषबाधा, ३९ जणांची तब्येत बिघडली
Nashik News: एका धार्मिक कार्यक्रमातील प्रसादातून नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना.
नाशिक: नाशिकच्या पेठमध्ये एका धार्मिक कार्यक्रमातील प्रसादातून नागरिकांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. ३९ जणांना विषबाधा झाली आहे. विषबाधा झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करत त्यांना उपचारांनंतर घरी सोडले आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नाशिक जिल्ह्यातील पेठ तालुक्यातील उभीधोंड गावातील एका धार्मिक उत्सवात प्रसादातून ३९ जणांना विषबाधा झाल्याची घटना घडली आहे. या गावातील ८ बाधित रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. तर ३१ रुग्णांना उपचारानंतर घरी सोडले आहे.
यानंतर डॉक्टरांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहोचलं. त्यानंतर डॉक्टरांनी ३९ पैकी ३१ रुग्णांवर उपचार करत घरी सोडले. तर ८ रुग्णांवर उपचार करण्यात येत आहे. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच आमदार नरहरी झिरवाळ हे घटनास्थळी पोहोचत रुग्णांवर योग्य उपचार करण्याबाबत डॉक्टरांना सूचना दिल्या.
Web Title: Nashik, 39 people were poisoned by Prasad
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App