Home Crime News पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

पत्नीने प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या

Nashik Crime

Nashik Crime : पेठ येथे सापडलेल्या मृतदेहाचा तपास करण्यात स्थानिक गुन्हे शाखेस (Crime Branch) यश आले आहे. सचिन उर्फ काळु दुसाने (रा.निफाड) असे खून झालेल्या मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी सचिनच्या पत्नीसह, तिचा प्रियकर व खुनात मदत करणाऱ्या इतर पाच जणांना अटक केली आहे.

पेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एक मृतदेह आढळून आला होता. या व्यक्तीची हत्या करून पुरावा नष्ट करण्याच्या इराद्याने मृतदेह फेकून दिल्याचे पोलिसांच्या प्राथमिक तपासातुन समोर आले आहे. मृतदेहाची ओळख पटवून पोलिसांनी तपासास सुरुवात केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेल्या माहितीनुसार हा खून निफाड येथील दत्तात्रय महाजन याने इतर साथीदारांसह मिळून केला. यानंतर माहितीच्या आधारे पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तपास सुरू केला.

पोलिसांनी संशयित दत्तात्रय यास ताब्यात घेत विचारपूस केली असता सुरुवातीस त्याने पळवाट शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यानंतर सखोल चौकशीत त्याने सचिन दुसाने यांचा खून केल्याची कबुली दिली. दत्तात्रयचे सचिनची पत्नी शोभा दुसाने हिच्यासोबत विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. आणि यामुळेच २२ जानेवारीला सचिनच्या घरातच सचिनला बेदम मारहाण करून त्यांनी जीवे मारले. यासाठी महाजन याने सचिनची पत्नी शोभा हिच्यासह नाशिक येथील डोसा विक्रेता संदीप किट्टू स्वामी, अशोक मोहन काळे यांची मदत घेतली. खून केल्यानंतर गुन्ह्यात वापरलेली हत्यारे आणि मोबाईलची विल्हेवाट लावण्यासाठी संशयितांना रिक्षा चालक गोरख नामदेव जगताप व पिंटु मोगरे उर्फ बाळासाहेब मारुती मोगरे यांनी मदत केल्याचे उघडकीस आले. यानंतर पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेतले आहे.

Web Title : Nashik Crime : Wife kills husband with boyfriend’s help

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here